शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत पाणी आल्याखेरीज सोलापूरला नाही

By admin | Updated: November 30, 2015 02:00 IST

जिल्ह्यातील इतर धरणांमधून उजनी धरणात पाणी आल्याखेरीज सोलापूरकडे पाणी सोडण्यात येऊ नये; असे महत्त्वाचे ठराव इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई

इंदापूर : जिल्ह्यातील इतर धरणांमधून उजनी धरणात पाणी आल्याखेरीज सोलापूरकडे पाणी सोडण्यात येऊ नये; असे महत्त्वाचे ठराव इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत एकमताने संमत करण्यात आले. या वेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार सूर्यकांत येवले या वेळी उपस्थित होते. भरणे म्हणाले की, यंदाच्या वर्षी तालुका दुष्काळाशी सामना करतो आहे. उन्हाळ्यापर्यंत परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे आता जरी टंचाई निवारणाचा आराखडा पंचायत समितीने तयार केला असला, तरी आगामी काळात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या गावांची यादी त्या त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी तयार करावी. ग्रामस्थांच्या सूचनांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात यावा. टँकर भरण्याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी अधिकारी व उपस्थित सरपंच-उपसरपंचांना केली. बैठकीच्या वेळी तरंगवाडी तलावात खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी बाळा ढवळे यांनी केली. विजय शिंदे यांनी वरच्या धरणांमधून दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे, असा ठराव मांडला. जर वरच्या धरणांमधून उजनी धरणात पाणी आले नाही, तर उजनी धरणात असलेले पाणी सोलापूरकडे सोडण्यात येऊ नये, अशी उपसूचना अ‍ॅड. नितीन कदम यांनी मांडली. अशाच आशयाचा ठराव पंचायत समिती सदस्य प्रताप पाटील यांनी मांडला. हे सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. तहसीलदार सूर्यकांत येवले, माजी गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी टंचाईचा आढावा घेतला. पंचायत समितीच्या सभापती डॉ. सोनाली ननवरे, श्रीमंत ढोले, प्रदीप गारटकर यांनी सूचना मांडल्या. बैठकीस उपसभापती नारायण वीर, माऊली चवरे, माऊली वाघमोडे, ऋतुजा पाटील,बापू चंदनशिवे व इतर कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.