शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

सोलापूर जिल्ह्यात लाळ, घटसर्प रोगांचा ४ हजार जनावरांना प्रादुर्भाव, २० जनावरे दगावली

By admin | Updated: March 24, 2017 14:55 IST

सोलापूर जिल्ह्यात लाळ, घटसर्प रोगांचा ४ हजार जनावरांना प्रादुर्भाव, २० जनावरे दगावली

सोलापूर जिल्ह्यात लाळ, घटसर्प रोगांचा ४ हजार जनावरांना प्रादुर्भाव, २० जनावरे दगावलीगुरसाळे : पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावात मागील १० दिवसांपासून घटसर्प व लाळ रोगाने थैमान घातले आहे. आजवर सात शेतकऱ्यांची २० जनावरे दगावली आहेत. जर्सी गार्इंना लाळीने घेरले असल्याने दूध उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकारी व डॉक्टर गावात उपचार करीत असले तरी रोगावर मात्र नियंत्रण येत नसल्याने पशुपालक धास्तावला आहे.खेडभोसे (ता. पंढरपूर) येथे शेतकऱ्यांकडे सुमारे पाच हजाराहून अधिक जनावरे आहेत. जर्सी गाई, बैल, म्हैस, शेळ्या यांचा त्यात समावेश आहे. गावात १५ दूध डेअरीच्या माध्यमातून दररोज १० हजार लिटर दूध संकलन होत होते. मात्र मागील १२ दिवसापासून लाळ व घटसर्प रोगाने गावात थैमान घातले असून आजवर सात शेतकऱ्यांची २० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते बंडू पवार यांनी सांगितले.गावातील पशुपालक सत्यवान मोरे (३), सिद्धेश्वर पवार (२), प्रशांत पवार (२), बंडू पवार (२), विनायक पवार (२), नवनाथ माने (२), अशोक साळुंखे (२) यासह २० जनावरे दगावली आहेत. जनावरांच्या तोंडाला लाळ येणे, ताप येणे, डरंगळणे, अशक्तपणा येणे, जनावरांच्या गळ्याला मोठी गाठ येऊन श्वास बंद होणे अशी लक्षणे या रोगाची आहेत. जर्सी गायीचे प्रमाण गावात जास्त असून पशुपालकांनी बॅँका, पतसंस्था व खाजगी सावकारांकडून कर्ज काढून जर्सी गायी खरेदी केल्या आहेत. या जर्सी गायींना सुरूवातीला ताप येऊन लाळ गळते. त्यामुळे दूध बंद होऊन ८-१० दिवसात गाय मृत्युमुखी पडत आहे. त्यामुळे पशुपालक धास्तावला आहे.दरम्यान घटसर्प व लाळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी निंबाळकर यांनी तालुक्यातील १० डॉक्टरांची टिम तयार करून गेले पाच दिवसापासून गावात तळ ठोकला आहे. परंतु जनावरे मरण्याचे प्रमाण थांबत नाही. शिवाय सिद्धेश्वर पाटील यांच्या गायीचे पोस्टमार्टम करून पुणे प्रयोगशाळेकडे अवयव पाठविले आहेत.::::::::::::::::::::::::::::::लाळ व घटसर्प रोगाचे लसीकरण ज्यावेळी पशुवैद्यकीय विभागाकडून सुरू असते. त्यावेळी शेतकरी लसीकरण करून घेत नाहीत. डॉक्टरांनी दिलेला सल्ला हा जनावरांच्या हितासाठी महत्त्वाचा असतो. सध्या गावात १० डॉक्टर, परिचर व औषधेही दिली आहेत. साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.- डॉ. चंद्रकांत निंबाळकरतालुका पशुवैद्यकीय अधिकारी::::::::::::::::::::::::गावातील शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. त्यात लाळ व घटसर्प रोगाने २० जनावरे दगावली आहेत. दूध संकलन मोठ्या प्रमाणात घटल्य९ाने शेतकरी अडचणीत आला आहे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, अशा शेतकऱ्यांना आ. बबनराव शिंदे, आ. प्रशांत परिचारक, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी मदत देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करावा. साथ आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांनीही प्रयत्न केला पाहिजे.- सुलभा साळुंखेसरपंच, खेडभोसे