शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात हॉस्पिटलमध्येच तलवारीने हल्ला

By admin | Updated: November 5, 2016 10:28 IST

शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 5 - शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला. किरकोळ कारणामुळे झालेल्या वादातून एका गटाने शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये घुसून दुस-या गटावर तलवारीने हल्ला चढवल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहे
 
यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.  सर्फराज जहागीरदार, सईद जहागीरदार, कदीर जहागीरदार, इम्रान शेख, समीर जहागीरदार, गाजी जहागीरदार, बरकत जहागीरदार, समद जहागीरदार अशी जखमींची नावे आहेत.
 
लोकमान्य नगरमध्ये जहागीरदार यांच्या बाईकला एका रिक्षाचालकाकडून धडक बसली होती. यावेळी दोघांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यातील दोन जणांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान झालेल्या वादाचा राग मनात ठेवून रिक्षाचालकाच्या गटातील सुमारे 40 ते 50 जणांनी हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये घुसून उपचार घेणा-या जहागीरदार यांच्या गटातील लोकांवर तलवारींसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
   
दरम्यान, यानंतर वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धावत घेत परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच हॉस्पिटलमध्येही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.