शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या दारी!

By admin | Updated: May 23, 2016 04:50 IST

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घ्यावे, यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणाची प्रयोगशाळा थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन येणार आहे.

राहुल कलाल ,  पुणेशेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घ्यावे, यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणाची प्रयोगशाळा थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन येणार आहे. शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो. दिवसरात्र राबतो. मात्र अनेकदा पीक चांगले येत नाही. यामागचे प्रमुख कारण शेतीतल्या मातीत अन्नघटकांची कमतरता असते. पीकांना हवे ते अन्नघटक मातीतून न मिळाल्याने उत्पादन घटते. हे ओळखून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतल्या मातीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे कळावे यासाठी जिल्हा स्तरावर मृदा परिक्षण व चाचणी प्रयोगशाळा आहेत. सध्या राज्यात अशा २९ प्रयोगशाळा आहेत. मात्र जिल्ह्यांचा विस्तार मोठा असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना मातीचे नमुने येथे घेऊन येणे जिकीरीचे होते. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे.तंत्रज्ञानाचा वापर करून काही खासगी कंपन्यांनी पोर्टेबल म्हणजे कोठेही, कधीही नेता येऊ शकणारी माती तपासणी यंत्रे बनवली आहेत. त्याचे परिणामही अचूक आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या मशीन्स सुमारे ७५ हजारांना मिळतात. त्यामुळे त्या तालुका स्तरावर उपलब्ध करण्याचा प्रयत्न कृषी विभाग करीत आहे. अलिकडेच पुण्यात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यात कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. त्याला खडसे यांनी हिरवा कंदील दाखवल्याने लवकरच ही यंत्रे कृषी विभागाकडे येणार आहेत.