शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअर इंजिनीअरवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: February 29, 2016 04:47 IST

हिंजवडीमधील आयटी कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअरवर तिचा सहकारी व त्याच्या मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना धानोरीमध्ये शनिवारी रात्री घडली.

पुणे : हिंजवडीमधील आयटी कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअरवर तिचा सहकारी व त्याच्या मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना धानोरीमध्ये शनिवारी रात्री घडली. शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीला बेशुद्ध केल्यावर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी पाच तरुणांसह एका तरुणीलाही अटक केली आहे.पीडित तरुणीचा कंपनीतील सहकारी अभिनव संतोष साही (२८, रा. शिवालिक सोसायटी, टिंगरेनगर, मूळ रा. देहरादून) व त्याचे मित्र आनंदविष्णू प्रल्हाद चन्नार (२८, रा. गोकूळनगर, धानोरी, मूळ रा. केरळ), देवब्रत प्रशांत दुबे (२४, रा. भैरवनगर, धानोरी, मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश), अभिजित गुणेंद्रकुमार देवराय (२६, रा. कलवड वस्ती, लोहगाव, मूळ रा. आगरतळा, त्रिपुरा), दीप्तांशु अखिलेशकुमार गुप्ता (२३, रा. सहकारनगर), तनुश्री हरबंससिंग जग्गी उर्फ चौधरी (३०, रा. धानोरी पोलीस चौकीजवळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वडील केंद्र शासनाचे निवृत्त अधिकारी आहेत. हे कुटुंब पुण्यातच राहते. शनिवारी संध्याकाळी ही तरुणी व अभिनव कंपनीमधील एका कार्यक्रमास जाणार होते. दोघेही एकाच भागात राहत असल्याने त्यांचे फोनवर एकत्र जाण्याबाबत बोलणे झाले. त्यानुसार पीडित तरुणी तिची कार घेऊन गुंजन सिनेमागृहाजवळ गेली. तेथे अभिनव तिच्या गाडीत बसला. कार्यक्रम सुरू होण्यास वेळ असल्याचे सांगत अभिनवने तिला कॉफी पिऊ, असे सुचवले. त्यानंतर दोघेही मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे तरुणीने ‘आईस टी’ मागवला. दोन कप आईस टी पिल्यानंतर तिला गुंगी यायला लागली. ती ग्लानीमध्ये असतानाच अभिनवने तिला गाडीत बसविले. त्यानंतर त्याने देवब्रतला फोन करुन मैत्रिणीला घेऊन येत असल्याचे सांगितले. दोन बेडरुमच्या या फ्लॅटमध्ये आधीच आनंदविष्णू, देवब्रत,अभिजीत, दिप्तांशू, तनुश्री हजर होते. या तरुणीला बेडरुममध्ये ठेवल्यानंतर आरोपींनी मद्यपान केले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर तिने घरी जाऊन हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. वडिलांसोबत जाऊन तिने पोलिसांत तक्रार केली. सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)