शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच ठरतात सॉफ्ट टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:06 IST

डॉक्टरवर्गाला समाजातील विविध घटकांकडून अनेकदा सॉफ्ट टार्गेट बनविले जात असल्याची खंत बी. जे. मेडिकल महाविद्यालय व ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली.

पुणे : आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावत असताना डॉक्टरवर्गाला समाजातील विविध घटकांकडून अनेकदा सॉफ्ट टार्गेट बनविले जात असल्याची खंत बी. जे. मेडिकल महाविद्यालय व ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली. आठव्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, राजेंद्र पवार, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अ‍ॅड. सुधाकर आव्हाड, स्वस्तिक सिरसीकर, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. प्रविण शिनगारे, उज्ज्वल ठेंगडी, डॉ. सुनील मांजरेकर, प्रा. मधुमती कुंजल, प्रा. लक्ष्मी झमन, विश्वदीप कुंजल, प्रा. अस्मिता दाणी, स्नेहल तावरे व डॉ. संजयकुमार तावरे व्यासपीठावर उपस्थित होते. बी. जे. मेडिकल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तांबे यांनी लिहीलेल्या ‘कुमारी माता : वैद्यकीय व कायदेशीर तरतुदी’ या स्नेहवर्धन प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘किडनी रॅकेटमध्येही डॉक्टरांना टार्गेट करण्यात आले होते. अनेकदा डॉक्टरांना विनाकारण जेलमध्येही जावे लागते. त्यामुळे शासन, कायदेतज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरीकांनीही डॉक्टरांशी निगडीत असणाऱ्या कायद्यांबाबत जागरुक असायला हवे. या सर्व गोष्टींबाबत खोलवर विचार व्हायला हवा.’’प्रशांत जगताप म्हणाले, आजही कुमारी मातांसारखे संवेदनशील विषय पुढे येत नाहीत. अशा प्रकारच्या प्रश्नावर मार्ग काढायचा असेल तर पालकांनी आपली भूमिका बदलण्याची आवश्यकता आहे. मुलांना योग्य वेळी योग्य गोष्टींबाबत माहीती देणे आवश्यक आहे. >अधिकाराविषयी चर्चा व्हावीमुलींवर संस्कार होतात, मात्र मुलांवरही आपण तितकेच संस्कार करतो का हा प्रश्न पालकांनी स्वत:लाच विचारायला हवा. मुलींचे अधिकार, पुरुषांवर असणारी जबाबदारी, संस्कार यांसारख्या मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी. कुमारी मातेसारख्या समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आपण काय करु शकतो याबाबत विचार व्हायला हवा, असे डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या.