शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीसाठी सॉफ्ट लोन; सहा कारखान्यांनाच फायदा

By admin | Updated: December 2, 2015 01:41 IST

गेल्या हंगामात गाळप करून ३१ आॅगस्ट २०१५ अखेर ५० टक्क्यांपेक्षा जास्त एफआरपीची (रास्त आणि किफायतशीर दर) रक्कम ऊस उत्पादकांना देणाऱ्या सहा साखर कारखान्यांना

मुंबई : गेल्या हंगामात गाळप करून ३१ आॅगस्ट २०१५ अखेर ५० टक्क्यांपेक्षा जास्त एफआरपीची (रास्त आणि किफायतशीर दर) रक्कम ऊस उत्पादकांना देणाऱ्या सहा साखर कारखान्यांना उर्वरित रक्कम देता यावी, यासाठी राज्य शासनाच्या सॉफ्ट लोन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.केंद्राच्या सॉफ्ट लोन योजनेच्या निकषात न बसलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना ऊस उत्पादकाना एफआरपीची उर्वरित रक्कम देता यावी, यासाठी राज्य शासनाने सॉफ्ट लोन योजना राबविण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला होता. मात्र, राज्य शासनाच्या सॉफ्ट लोन योजनेत काही तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरलेल्या सहा साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन योजनेतून व्याज अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार महाडिक शुगर लिमिटेड जि. कोल्हापूर, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड दहीटणे, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर, माणगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनारसिद्धनगर, ता. आटपाडी, जि. सांगली, कुमुदा-रयत सहकारी साखर कारखाना लिमिटेड शेवाळवाडी, ता. कराड, जि. सातारा, चोपडारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगाव आणि महाराष्ट्र शेतकरी शुगर लिमिटेड साईखेड, ता. सोनपेठ, जि. परभणी यांचा समावेश आहे.साखर कारखान्यांना बँकांमार्फत ३१ डिसेंबर पर्यंत मंजूर व वितरित केलेले कर्ज व्याज अनुदानास पात्र ठरणार आहे. सरळ व्याजाच्या १० टक्के किंवा बँकेकडून आकारण्यात येणारा व्याजदर यामधील जो दर कमी असेल, त्यानुसार ५ वर्षांच्या रिड्युसिंग बॅलन्सनुसार सरळ व्याजाची रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. योजनेतील सहा साखर कारखान्यांना त्यांच्या उत्पादित पांढऱ्या साखरेच्या ११ टक्के किंवा ३१ आॅगस्ट अखेर प्रलंबित ऊस देयकातून उचल न केलेले तारण कर्ज वजा जाता उर्वरित रकमेपैकी जी रक्कम कमी असेल इतक्या कर्जास त्यांच्या कर्ज उचल क्षमतेनुसार अनुदान देण्यात येईल. त्यानुसार हे कारखाने अंदाजे ३८ कोटी ३७ लाख ८० हजार इतक्या कर्ज रकमेस पात्र आहेत. (विशेष प्रतिनिधी)