शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

सोसायटीचा छोटा; पण गुणी ‘परिवार’

By admin | Updated: June 8, 2017 02:18 IST

गोरेगाव पूर्वेकडील ‘परिवार को-आॅपरेटिव्ह- हाउसिंग सोसायटी’ ही सोसायटी आकाराने लहान असली, तरी या सोसायटीने वेगळा लौकिक प्राप्त केलेला आहे

सागर नेवरेकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव पूर्वेकडील ‘परिवार को-आॅपरेटिव्ह- हाउसिंग सोसायटी’ ही सोसायटी आकाराने लहान असली, तरी या सोसायटीने वेगळा लौकिक प्राप्त केलेला आहे. या इमारतीचे बांधकाम १९९४ साली सुरू होऊन १९९७ साली ते पूर्ण झाले. ही इमारत ७ मजली असून, येथे ३० कुटुंब गुण्यागोविंदाने राहतात. ज्येष्ठ नागरिक संघ, अत्रे कट्टा-मुक्त व्यासपीठ, जॉगर्स मॉर्निंग वॉकर आणि गोरेगाव महिला मंडळ इत्यादी उपक्रमांत सोसायटीतील सदस्य सहभागी होतात. तसेच सोसायटीमध्ये १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी ध्वजवंदन उत्साहात साजरे होते. लहान मुलांसाठी सांस्कृतिक आणि खेळाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ठेवला जातो. दरवर्षी २ आॅक्टोबरला स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. दरवर्षी सामूहिक सहलीचेही आयोजन करण्यात येते.सोसायटीमध्ये जागेचा अभाव असल्याकारणाने जयप्रकाशनगर परिसरातील उद्यान आणि जिमखान्याचा वापर लहान मुले आणि सदस्य करतात. सोसायटीमधील कमिटी ९ सभासदांची असून, त्यात ४ महिलांचा सहभाग आहे. सोसायटीमधील ३० सभासदांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवला आहे. त्यात आठवड्याला होणाऱ्या बैठकीसंदर्भात सभासदांबरोबर संवाद साधला जातो. त्यात सोसायटीविषयी सर्व गोष्टींवर चर्चा होते. सोसायटीच्या परिसरात धूम्रपान, मद्यपानास सक्त मनाई आहे. सर्वधर्मीय लोक या सोसायटीत राहतात. एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होतात. सगळ््या प्रकारचे सण साजरे केले जातात. सोसायटीमध्ये जागेच्या कमतरतेमुळे कार्यक्रम आणि उपक्रमांसाठी कार्यालयाचा वापर केला जातो. डॉ. कविश्वर यांच्याकडून सोसायटीच्या सभासदांची नियमित रक्त तपासणी केली जाते.अत्यंत कमी जागा असूनही सोसायटीने नारळ, जांभूळ, पिंपळ, बदाम, फणस ही मोठी झाडे जोपासली आहेत. पावसाळ््यात छोट्या फुलबागेचे काम करण्यात येणार आहे. कचरा बाहेर टाकण्यास मनाई केली जाते. सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे विभाजन करून विल्हेवाट लावली जाते. ही सोसायटी पूर्णपणे टँकरमुक्त आहे. पाण्याचे नियोजनही उत्तम प्रकारे केले जाते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सदस्यांचा पुढाकार असतो. सोसायटीच्या परिसरात १ बोरवेल असून, त्या पाण्याचा झाडांना, वाहने धुण्यास तसेच शौचालयासाठी वापर केला जातो. महापालिकेच्या पाण्याच्या २ टाक्या असून, १ टाकी केवळ बोरवेलच्या पाण्याची आहे. २ सुरक्षारक्षक आणि १ सफाई कामगार सोसायटीत सदैव तैनात असतात. परिवार सोसायटी पूर्णपणे तंटामुक्त आहे. काही वेळा किरकोळ भांडण झाले, तरी लेखी स्वरूपात तक्रार स्वीकारली जाऊन सामोपचाराने भांडण सोडविले जाते. चैतन्य भोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सोसायटीत लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे.>पोलिसांना अशी होते मदत परिसरात एखादा गुन्हा झाला तर परिवार सोसायटीची पोलिसांना मदत होते. या सोसायटीत ८ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सोसायटीच्या बाजूने रस्ते असल्यामुळे सगळ्या जाणाऱ्या-येणाऱ्यांचे रेकॉर्डिंग या कॅमेऱ्यांमध्ये होते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा हे सीसीटीव्ही फूटेज गुन्ह्यांचा माग काढताना उपयोगी पडते. सोलारमार्फत खतनिर्मितीसोलार यंत्रणेवर चालणाऱ्या मशिनचा वापर करून ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार करण्याचे काम सध्या सोसायटीमध्ये सुरू आहे. हा प्रकल्प अन्य सोसायट्यांसाठीही आदर्श ठरणार आहे. रमेश प्रभू यांचे सहकार्यरमेश प्रभू अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे सदस्यत्व ‘परिवार को-आॅपरेटिव्ह- हाउसिंग सोसायटी’कडे आहे. तसेच सुरुवातीच्या काळात सोसायटीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. तेव्हा रमेश प्रभूंनी मदत केल्याची आठवण सदस्यांनी सांगितली. सहभागासाठी आवाहनलोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘आमची सोसायटी, आमचं कुटुंब’ या उपक्रमात आपल्या गृहनिर्माण संस्थेला सहभागी व्हायचे असल्यास आपण  lokmat.mahasewa@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता.