शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्तेही लोकसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:02 IST

पर्यायी राजकारणाचा आग्रह; काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप

- सुधीर लंके ।लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : देशातील सध्याचे सरकार परवडणारे नाही म्हणून सर्व लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्ष सामाजिक कार्यकर्त्यांनी व विविध घटकांनी थेट निवडणुकीच्या प्रचारात उतरुन पर्यायी राजकारण उभारावे, असा एक मतप्रवाह सुरु झाला आहे. या कार्यकर्त्यांच्या पुणे तसेच जालना, सांगली येथे काही बैठकाही झाल्या आहेत.

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, पर्यावरणतज्ज्ञ विश्वंभर चौधरी, अंजली दमानिया, पारोमिता गोस्वामी, प्रतिभा शिंदे,चंदू चव्हाण, कुमार नागे, डॉ. मिलींद मुरुरकर, पल्लवी रेमणे, नंदू माधव, हेरंब कुलकर्णी यांसह विविध आघाड्यांवर काम करणारे कार्यकर्ते पुण्यातील बैठकीला उपस्थित होते. देशात मोदी सरकारच्या काळात लोकशाहीविरोधी प्रवृत्ती वाढल्या आहेत. याबाबत या सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीत चिंता व्यक्त केली. केवळ बघ्याची भूमिका न घेता थेट निवडणुकीत उतरण्याची तयारी या कार्यकर्त्यांनी केली आहे.इतरांचा विचार का केला जात नाही?कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांच्यासोबत चर्चा केली आहे. काँग्रेस व राष्टÑवादीचे नेते पारंपरिक राजकीय गणितांमधून बाहेर येत नाहीत. घराणेशाही व धनिकांच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विचारात घेताना दिसत नाही.