शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाविरोधासाठी ‘सोशल’ चळवळ

By admin | Updated: June 30, 2016 04:09 IST

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून गोंधळी समाजाने हुंडाविरोधी चळवळ सुरू केली आहे

सतीश डोंगरे,

नाशिक- सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून गोंधळी समाजाने हुंडाविरोधी चळवळ सुरू केली आहे. हुंड्यासारख्या अनिष्ट पद्धतीला विरोध करण्यासाठी समाजातील समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘व्हॉट्स अ‍ॅप आणि हाईक’वर ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपमध्ये देशभरातील समाजातील लोक सदस्य आहेत.गोंधळी समाजात ‘नवऱ्या मुलाला महागडी वस्तू देणे किंवा वधूकडच्या लोकांनी लग्नात दोन्ही बाजूंचा खर्च करण्याची अट घातली जाते. ही प्रथा दूर करण्यासाठी येथील विजय रेणुके यांनी सोशल मीडियावर हुंडाविरोधी चळवळ उभारण्याचे ठरविले. त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर ‘शुभमंगल गोंधळी’ नावाने गु्रप तयार केला. ग्रुपच्या माध्यमातून इच्छित वधू-वर शोधले जाऊ लागले; मात्र त्याचबरोबर हुंडाविरोधी सूरही उमटू लागला. त्यानंतर ग्रुपचे नाव ‘हुंडाविरोधी वधू-वर (गोंधळी)’ असे ठेवण्यात आले. ग्रुपमधील सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ‘हाईक’च्या माध्यमावर हा ग्रुप सध्या चालविला जात आहे. ग्रुपमध्ये वधू-वरांचा सहभाग अधिक असून समाजात व्यापक जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. >२६० सदस्य‘हुंडाविरोधी वधू-वर ग्रुपमध्ये (गोंधळी)’ राज्यातील तब्बल २६० सदस्य आहेत. त्यात २० टक्के पालकांचाही समावेश आहे. ही सर्व मंडळी ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही’ या तत्त्वाप्रमाणे ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत. वर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ चालविली जात आहे. ‘हुंडाविरोधी वधू-वर (गोंधळी)’ या ग्रुपमुळे समाजात हुंडाविरोधी गट निर्माण झाला आहे. हुंड्यामुळे होणारे दुष्परिणाम एकमेकांना शेअर केले जात असल्याने लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती होत आहे. ग्रुपच्या सदस्यांची संख्या सतत वाढत आहे. समाजातील लोक हुंडा पद्धतीला कडाडून विरोध करीत असल्याचे बघावयास मिळत आहे. - विजय रेणुके, ग्रुप अ‍ॅडमिन