शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा चित्रपटातून सामाजिक संदेश : भोसले

By admin | Updated: November 24, 2014 23:57 IST

‘इफ्फी’त माहिती : लवकरच होणार प्रदर्शित

संदीप आडनाईक - पणजी -‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या सारखा चित्रपट असो, की ‘देवयानी’सारखी मालिका असो, आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या नागेश भोसले यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावर चित्रपट निर्माण केला आहे. या चित्रपटातून केवळ मनोरंजन नव्हे, तर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता नागेश भोसले यांनी दिली.आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या नागेश भोसले यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. देवयानी मालिका सोडल्यानंतर काही काळ विश्रांती घेण्यासाठी पन्हाळगडावर गेलो होतो. तेथेच या चित्रपटाचा विषय सुचल्याचे भोसले म्हणाले. या चित्रपटासाठी कोल्हापूरचेच लेखक विद्यासागर अध्यापक यांनी पटकथा लिहिली आहे. विशेष म्हणजे मकरंद देशपांडे, संग्राम साळवी, अमृता संत, समिधा गुरू, डॉ. राज होळकर आणि नागेश भोसले हे चित्रपटात भूमिका करत आहेत. या चित्रपटाचा विषय हा पन्हाळ्याभोवती गुंफलेला आहे. चित्रपटाचे चित्रीकरणही पन्हाळ्यावरच केले असून, अवघ्या १७ दिवसांत हा चित्रपट पूर्ण केला आहे. पन्हाळ्याला ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ आहेत. स्थानिक पर्यटन, रोजगार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या विस्मरणासोबतच आधुनिक युगात मानवी नातेसंबंधही तुटत चालले आहेत, याविषयी हा चित्रपट भाष्य करतो. स्वच्छ आणि निर्मळ हवा, नयनरम्य वातावरण, जबरदस्त अदाकारी तसेच काळजाला हात घालणाऱ्या प्रसंगाचे चित्रण या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण अमरेंद्र भोसले यांनी केले आहे. चित्रपटात एक गाणेही आहे, पण शीर्षकगीत असेल. ‘पन्हाळा’ हा पहिला पश्चिम महाराष्ट्रातील चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर येतो आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून तो पावणेदोन तासाचा आहे. चित्रपटात मुख्य कलाकारांशिवाय बहुतेक कलाकार स्थानिक आहेत, असेही भोसले यांनी सांगितले.