शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाही ‘कलरफुल्ल’

By admin | Updated: March 25, 2016 01:13 IST

दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सप्तरंगांची उधळण सुरू झाली होती. याचाच प्रत्यय गुरुवारी धूलिवंदनाच्या दिवशी झालेल्या जोरदार सेलीब्रेशनमध्येही दिसून आला.

मुंबई : दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सप्तरंगांची उधळण सुरू झाली होती. याचाच प्रत्यय गुरुवारी धूलिवंदनाच्या दिवशी झालेल्या जोरदार सेलीब्रेशनमध्येही दिसून आला. पाण्याचा अपव्यय टाळत, सुक्या रंगांची होळी खेळत मुंबईकरांनी धुळवड साजरी केली. मुंबईकरांनी जोशपूर्ण वातावरणात मात्र सामाजिक भान जपत रंगपंचमी साजरी केल्याचे दिसून आले. शिवाय, या हटके सेलीब्रेशनचे फोटोस् आणि स्टेट्स लगेचच फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्स अ‍ॅप आणि टिष्ट्वटरवर दिसून आले. बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेला रंगपंचमीचा जल्लोष गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत दिसून आला. शिवाय, दुपारनंतर सर्वांचेच व्हॉट्स अ‍ॅप डीपी विविध रंगांमध्ये न्हाऊन गेलेले दिसून आले.मुंबईतील विविध महाविद्यालयांच्या तरुणाईने गुरुवारी निवासी वसाहतींमध्ये जाऊन पाणी न वापरता रंगपंचमी साजरी करण्याविषयी जनजागृती केली. तर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बालगृहाला भेट देत तेथील चिमुरड्यांसोबत रंगपंचमी साजरी करत त्यांचा आनंद द्विगुणित केला. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदिवासी पाड्यांना भेट देऊन त्यांच्यासोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. तर काही मंडळांनी पुरणपोळीचा नैवेद्य रस्त्यांवरील वंचित व्यक्तींना दान करीत अनोखी होळी साजरी केली. यात मुंबईतील अनेक स्वंयसेवी संस्थांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)