शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे असंतोषाला वाट !

By admin | Updated: February 29, 2016 04:32 IST

आमच्या अंगावर खाकी आहे, हा आमचा गुन्हा आहे का? ‘आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत.

पुणे : ‘आमच्या अंगावर खाकी आहे, हा आमचा गुन्हा आहे का? ‘आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत.’ ‘आम्हाला संघटीतत होता येत नाही,अन्यायाविरुद्ध दाद मागता येत नाही, पगारवाढीसाठी संपावर जाता येत नाही.’ ‘अरे किती कराल शोषण आमचं’, अशा व्यथा मांडणारे मेसेज सध्या सोशल मीडियावरून फिरत आहेत. खादी वर्दीवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्विग्न झालेल्या पोलिसांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आणि सोशल मीडियाद्वारे असंतोषाला वाट मोकळी करुन दिली आहे. ‘आम्ही सर्व पोलीस एक आहोत’ अशी ‘इमेज’ व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा डीपी ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना जेवढे कमकुवत कराल तेवढीच गुंडगिरी फोफावेल. पोलिसांवर सर्रास उचलले जाणारे हात ही भविष्यातील धोक्यातील घंटा आहे. आज लोकांना पोलिसांवर हात उचलून छान वाटत असेल, मात्र जेव्हा त्यांची मानसिक शक्ती संपेल आणि तो कमकुवत, लाचार होईल तेव्हा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. व्यवस्था आणि लोकांची अनास्था यामुळे अर्धमेल्या झालेल्या पोलिसांकडून त्यावेळी मदतीची अपेक्षा करण्यात अर्थ उरणार नाही, अशी भूमिका पोलीस कर्मचारी मांडत आहेत.गुन्हेगारावर कारवाई करताना पुढाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फोन सुरू होतात. त्यांना न जुमानता कारवाई केली तर बदलीची भीती घातली जाते. दुर्दैव म्हणजे अशा कारवायांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेकदा बदल्या झाल्याचीही उदाहरणे आहेत. राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना प्रवेश देतात. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात. मग पोलिसांचा दरारा कसा राहील? राजकीय झालर पांघरलेल्या पांढरपेशा गुन्हेगारांना रोखण्याची पोलिसांना खरोखरीच मोकळीक असते का? किंबहुना ती दिली जाते का, याचा कोणी विचार करत नाही, असा सवालही एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.एका आमदाराने तलाठ्याला मारहाण केली तर राज्यातील सर्व तलाठी संपावर जाण्याच्या तयारीला लागले होते. संबंधित आमदारावर तातडीने कारवाई झाली. पोलिसांना संपाचा आणि संघटीत होण्याचा अधिकार नसल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उघड निषेध नोंदवता येत नसल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)बीडमधील राहुल दुबाले तरुणाने पुढाकार घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्थापना केली. त्याचे वडील आणि दोघेही भाऊ पोलीस खात्यात कार्यरत आहेत. ‘बस झाली आता सहनशीलता, बस झाले आता खाकीवर हल्ले, आता पेटून उठाच..’ असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून महाराष्ट्रातील ‘पोलीसपुत्रां’ना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. समाजाचे रक्षण करतात त्यांचे संरक्षण कोण करणार? महिलांचा आदर कोण करणार? हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न घेऊन महाराष्ट्रातील ‘पोलीसपुत्र’ सोमवारी मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती दुबाले याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. शासनाने अशा हल्लेखोरांवर जरब बसविण्यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांमध्यो पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. लातूरच्या पानगावमध्ये पोलिसांना झालेली मारहाणीची घटना ताजी असताना, ठाण्यातही महिला वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण झाली. त्यात कांदिवलीमध्येही दोन पोलिसांना बेदम मारहाण झाल्याची घटना ताजी आहे. शासनाने अजूनही मौन बाळगल्याने आणखी किती असा अन्याय सहन करायचा? असा प्रश्न पोलीस कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच बीडमधील राहुल दुबाले तरुणाने पुढाकार घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्थापना केली असून पोलिसांवरील प्रश्नांसाठी मंत्रालयात जाऊन प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.