शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया बनले तरूणाचे रोजगाराचे साधन

By admin | Updated: May 15, 2017 09:16 IST

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामुळे माहितीच्या जगात क्रांती झाली आहे. काही सेकंदात माहितीची आदान-प्रदान होत असते.

आॅनलाईन लोकमत जळगाव, दि. १४ -गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामुळे माहितीच्या जगात क्रांती झाली आहे. काही सेकंदात माहितीची आदान-प्रदान होत असते. सोशल मीडियाचे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी उच्च शिक्षणच असले पाहिजे असे नाही. तर त्या क्षेत्रातील आवड, नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असली की अल्पशिक्षीत तरूणही सोशल मीडिया लिलया हाताळू शकतात. याचा अनुभव अमळनेरच्या लक्ष्मीकांत सोनार या तरूणाच्या माध्यमातून येतो.

अल्पशिक्षित असलेल्या लक्ष्मीकांत सोनारने जिद्दीच्या जोरावर सोशल मीडियाचे तंत्रज्ञान आत्मसात केल्याने आज त्याचे सोशल मीडिया हेच रोजगाराचे साधन बनले आहे. लक्ष्मीकांतची कौटुंबिक स्थिती म्हटली तर हालाखीचीच. वडील मकरंद सोनार हे मूकबधीर आहे. तर आई दुसरीकडे घरकाम करते. परिस्थिती अभावी त्यालाही जास्त शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे दहावी अनुत्तीर्ण असलेल्या लक्ष्मीकांतवरच कमी वयात घर सांभाळण्याची जबाबदारी आली. सुरुवातीला तो शहरातील एका संगणकाच्या दुकानावर कामाला लागला. ते काम करत असताना, त्याने संगणकाचे ज्ञान, इंटरनेटचे ज्ञान मिळविले. तो संगणक क्षेत्रात तरबेज झाला. 

गेल्या काही वर्षांपासून फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अमळनेर सारख्या लहान शहरातदेखील फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ७० हजारच्या आसपास आहे. या सोशल साईटचा उपयोग मनोरंजासाठी होत असला तरी त्यातून उत्पन्नदेखील मिळू शकते. ज्या युजर्संना फेसबुकचा वापर करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. अशांचे फेसबुक पेज तयार करुन त्यातून रोजगार मिळू शकतो हे लक्ष्मीकांतने हेरले. 

आपले विचार जगापर्यंत अगदी काही क्षणात पोहोचविण्यासाठी सोशल मीडियापेक्षा पेक्षा चांगले माध्यम कोणतेही नाही. अर्थात याचा बहुतांश वापर हा टाईमपास आणि मनोरंजनासाठी केला जातो. ठराविक लोक या माध्यमाचा वापर अत्यंत विधायक करत असल्याचे करतात. आज सोशल मीडियावर विविध सेलिब्रेटीपासून ते अगदी गल्लीबोळातील संस्था प्रतिष्ठाने, भाऊ-दादा, स्थानिक नेते आदींचे पेजेस आहेत. त्यांची पेजेस तालुका आणि गावास केंद्र्रस्थानी ठेवणारी आहेत. मात्र प्रसिद्धीची हाव असणाऱ्या या लोकांना आपले अकाऊंट मॅनेज करणे जमत नाही किंवा पुरेसा वेळ त्यांच्याकडे नाही, अशा लोकांचे फेसबुक पेज तयार करून ते रोज अपडेट करण्याची जबाबदारी एखाद्या व्यक्तीकडे सोपवतात. लक्ष्मीकांत सोनारकडे शहर आणि तालुक्यातील ४३ लोकांचे सोशल मीडियाच्या पेजची जबाबदारी आहे.

व्यवसायिक, राजकारणी, तरुण, उद्योजक, यांच्याशी संबंधित लक्ष्मीकांत सोनार रोज अपडेट करीत असतो.त्या बदल्यात या व्यक्तींकडून त्याला काही पैसे मिळतात. त्यातून तो आपल्या कुटुंबाच्या चरितार्थ चालवत असतो. त्याची क्रिएटिव्हिटी पाहून दिवसेंदिवस त्याच्याकडे सोशल साईटचे काम वाढत आहे.

त्याने २०१३ पासून अमळनेर लाईव्ह नावाचे पेज सोशल मीडियावर जनतेसमोर आणले. प्रारंभी अमळनेर शहरातील विविध घडामोडी, शहराची खास वैशिष्ठये आदी बाबी अपडेट करण्यात यायच्या हळूहळू पेजेसचे चाहते वाढू लागले. या पेजेसवर दररोज नवनवीन विषयांचे वैविध्य राखल्याने ते सोशल मीडीयाधारकांच्या पसंतीस उतरले आहे. विशेष बाब म्हणजे घडामोडी आणि वायरल न्यूजच्या बाबतीत या पेजसच्या लाईक्स आणि व्ह्यूवर्सने झपाट्याने वाढत असून दोन हजारचा टप्पा ओलांडला आहे. सोशल मीडियाच पेजेसची जबाबदारी सांभाळून तो ग्राफिक्स डिजीटल डिझाईनचा व्यवसाय करतो.