शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बहिष्कार ठरेल अपराध

By admin | Updated: July 13, 2017 04:41 IST

समूह तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावरील सामाजिक बहिष्काराला बंदी घालणारा कायदा ३ जुलै २०१७ पासून महाराष्ट्रात अंमलात आला

धर्मराज हल्लाळे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : एखादी व्यक्ती वा व्यक्तींचा समूह तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावरील सामाजिक बहिष्काराला बंदी घालणारा कायदा ३ जुलै २०१७ पासून महाराष्ट्रात अंमलात आला आहे. जादूटोणा विरोधी विधेयकानंतर सामाजिक बहिष्कारासंदर्भात अस्तित्वात आलेल्या दुसऱ्या सामाजिक सुधारणेच्या कायद्याने अंनिसच्या लढ्याला यश मिळाल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी दिली. सामाजिक बहिष्कारावर बंदी आणण्याकरिता महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेल्या कायद्याला २० जून २०१७ रोजी राष्ट्रपतींनी संमती दिली असून, ३ जुलै रोजी सदर अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा कायदा ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध बंदी व निवारण) अधिनियम २०१६’ या नावाने ओळखला जाईल. जातपंचायत व अन्य माध्यमातून सामाजिक बहिष्कारामुळे व्यक्ती वा समुहाच्या मूलभूत अधिकारांचे हनन होते. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी प्रदीर्घ लढा दिला. नाशिकमध्ये जातपंचायतीचे प्रकरण समोर आल्यानंतर डॉ. दाभोळकर यांनी ८ आॅगस्ट २०१३ रोजी जातपंचायतीच्या विरोधात परिषद घेतली होती. त्यानंतर १५ आॅगस्ट रोजी लातूर येथे परिषद झाली. आता सामाजिक बहिष्कार बंदी कायद्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नियुक्त होतील, असेही प्रधान सचिव बावगे यांनी सांगितले. सदर अधिकारी सामाजिक बहिष्कार अपराधांचा शोध घेतील. भादंवि कलम ३४, १२० (क), १२० (ख), १४९, १५३ (क), ३८३ ते ३८९ तसेच ५११ अन्वये अपराध सिद्ध झाल्यास दोषारोपपत्र दाखल होईल. >समाजातून वाळीत टाकण्याला बसणार प्रतिबंध समाजातील कोणत्याही सदस्याला सामाजिक, धार्मिक, सामूहिक कार्यक्रम तसेच समाज मेळाव्यात प्रतिबंध करणे, विवाह, अंत्यविधी वा इतर विधी संस्कार पार पाडण्यासाठी समाजातील सदस्याचा हक्क नाकारणे, कोणत्याही कारणावरून वाळीत टाकण्याची व्यवस्था करणे, समाजातील व्यक्तीचे व्यावसायिक तसेच व्यापारविषयक संबंध तोडण्यासाठी प्रवृत्त करणे, समाजातून काढून टाकण्याची व्यवस्था करणे अशी अनेक कृत्ये सामाजिक बहिष्कार बंदी कायद्याअंतर्गत अपराध ठरतील.>भादंवि कलम ३४, १२० (क), १२० (ख), १४९, १५३ (क), ३८३ ते ३८९ तसेच ५११ अन्वये अपराध सिद्ध झाल्यास दोषारोपपत्र दाखल होणार असून त्यानंतर त्याचा खटला चालेल.