शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल’ भावनांचे होणार विश्लेषण

By admin | Updated: March 28, 2017 03:03 IST

सोशल मीडियावरून व्यक्त होणाऱ्या मजकुरातील भावनांची वर्गवारी करणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी पुण्यातील प्रगत

पुणे : सोशल मीडियावरून व्यक्त होणाऱ्या मजकुरातील भावनांची वर्गवारी करणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी पुण्यातील प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) ई-विदुर ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. मजकूर आणि त्यामधून प्रतित होणारी त्याची मन:स्थिती यांमधील परस्परसंबंधांचे विश्लेषण या प्रणालीद्वारे करता येणार आहे. ‘सी-डॅक’ने ई-विदुरसह मोझॅक, डिजिटायल या संगणक प्रणाली आणि परम शावक डीएल जीपीयू हा सुपरकॉम्प्युटर तयार केला आहे. कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. टिष्ट्वटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियाद्वारे संवाद साधणे आणि विचार मांडणे सहज सोपे झाले आहे. अशा मजकुराच्या भावनिक पातळीची सकारात्मक, नकारात्मक आणि अलिप्त अशी वर्गवारी करता येणार आहे. सोशल मीडियावरील माहितीमधून दिलेल्या विषयानुसार भावनिकतेची पातळी या तंत्राने आपोआप मोजली जाते. संशयास्पद नेटवर्क्सच्या सोशल मीडियावरील हालचाली, एखाद्या गुन्ह्याचा पुरावा मिळवणे, ड्रगचे व्यापारी, अतिरेकी, अवैध निर्वासित त्यांचा तपास करणे, विशिष्ट ट्रेंड पाहणे, नेटिझन्समधील चर्चेचा विषय, भावना, प्रतिसादांची उकल करणे अशा विविध बाबी या प्रणालीतून साध्य करता येणार आहेत. ‘मोझॅक’ ही संगणक प्रणाली नवीन औषधनिर्मितीसाठी फायदेशीर ठरणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले एखादे औषध इतर कोणत्या आजाराची उपयुक्त ठरू शकते का, याचे संशोधन वेगाने करता येणार आहे. त्यामुळे औषधनिर्मितीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे, तर ‘डिजिटायल’ या प्रणालीमुळे संगणकावर तयार केलेले इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्डस्, आॅडिओ, व्हिडिओ, ईमेल, स्लाईड तसेच इतर महत्त्वाचे दस्तावेज दीर्घ काळ जतन करणे शक्य होणार आहे. सी-डॅकचा आज स्थापना दिन सी-डॅकचा मंगळवारी स्थापना दिन असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात चारही संगणक प्रणालींचे अनावरण केले जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, लखनौ येथील प्रा. सरोज कांता मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती असेल. डॉ. नारळीकर यांचे ‘अंतराळ आणि संगणक : सुरुवातीच्या काळातील अनुभव’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.