शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

...तर आम्हीही जाळपोळ करू!

By admin | Updated: June 27, 2016 05:52 IST

लोकशाहीत प्रत्येकाला लिखाणाचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे.

मुंबई : लोकशाहीत प्रत्येकाला लिखाणाचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार  आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांचे पुतळे जाळून जे आंदोलन करत आहेत त्यांना  त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत भाजपाने रविवारी शिवसेनेच्या आंदोलनांचा समाचार घेतला. शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षात गेल्या काही दिवसांपासून वादाचे कवित्व अजून संपलेले नाही. सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सतत आमच्या विरोधात लिहिणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्यांनी आम्हालाही तशीच आंदोलने करणाच्या अधिकार आहे, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे यापुढे तशीच प्रतिक्रिया भाजपातून उमटली तर सहन करण्याची तयारी ठेवावी, असा इशारा मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला. आतापर्यंत एकमेकांवर बोचरी टीका करणाऱ्या भाजपा-शिवसेनेत जाळपोळीच्या निमित्ताने संघर्षाचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे.मुंबई भाजपाच्या वतीने रविवारी ‘मन की बात, चाय के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या वेळी शिवसेना आणि त्याच्या मुखपत्राचे नाव न घेता शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपा नेत्यांवरील बोचरी टीका होत असते. त्यामुळे भाजपानेही अलीकडेच आपल्या ‘मनोगत’ या पाक्षिकातून शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजपा प्रवक्ता माधव भांडारी यांनी आपल्या एका लेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना शोले चित्रपटातील ‘असरानी’ यांच्याशी केली. यावर चिडलेल्या शिवसैनिकांनी माधव भांडारी यांचे पुतळे जाळले आणि ‘मनोगत’ची होळी केली. शिवसेनेच्या या जाळपोळीला जाळपोळीने उत्तर देण्याची भूमिका भाजपाने घेतली. (प्रतिनिधी)>फडतूस धमक्याकायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याचा कारभार आहे. त्यामुळे उघडउघड जाळपोळीची धमकी देणाऱ्या आशिष शेलारांवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करावी. त्यांच्या फडतूस धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही, असा टोला शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी हाणला.