शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

...म्हणून अडीच हजार कुटूंबाचे रेशन, पाणी बंद

By admin | Updated: August 24, 2016 21:28 IST

महापालिका हद्दीतील सुमारे अडीच हजार कुटूंबांना वारंवार विनंती करूनही वैयक्तिक शौचालय बांधलेली नाही. यातील २६६ जणांनी तर पालिकेकडून शौचालयाचे अनुदानही उचलले आहे.

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 24  : महापालिका हद्दीतील सुमारे अडीच हजार कुटूंबांना वारंवार विनंती करूनही वैयक्तिक शौचालय बांधलेली नाही. यातील २६६ जणांनी तर पालिकेकडून शौचालयाचे अनुदानही उचलले आहे. त्यामुळे आता महापालिकेने या अडीच हजार कुटूंबांचे धान्य, वीज, पाणी व गॅस बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बुधवारी पालिकेच्या आरोग्य विभागाला तसे आदेशही दिले.आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून स्वच्छतेच्या कामाला महत्व दिले आहे. खुद्द आयुक्तांनी शहरातील झोपडपट्ट्यात स्वच्छता मोहिम राबवून नव्या उपक्रमाला सुरूवात केली आहे. त्यात शासनाकडूनही स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीचे आदेश पालिकेला प्राप्त झाले आहे. बुधवारी दुपारी आयुक्तांनी सर्व स्वच्छता निरीक्षक, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत वैयक्तिक शौचालय योजनेचा आढावा घेण्यात आला.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त खेबूडकर म्हणाले की, महापालिका हद्दीतील २६६ जणांनी शौचालयाचे अनुदान घेतले आहे. पहिला सहा हजाराचा हप्ता देऊनही या कुटूंबांनी अजून बांधकाम सुरू केलेले नाही. गेल्या आठ महिन्यापासून ही प्रक्रिया रखडली आहे. मध्यंतरी या कुटूंबांना १५ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण तरीही त्यांनी शौचालये बांधलेली नाहीत. या कुटूंबाना एकूण १६ लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. पालिकेकडून या कुटूंबावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी चालविली होती.शहरात अजून दोन हजार कुटूंबे उघड्यावर शौचालयास जात आहेत. त्याची यादीही आरोग्य विभागाकडे तयार आहे. या सर्व कुटूंबांचे पाणी कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया लवकरच पाणीपुरवठा विभागाकडून सुरू होईल. वीज मंडळ व गॅस एजन्सीला पत्र देऊन या कुटूंबाचे वीज व गॅस बंद करण्याची विनंती केली जाणार आहे. शिवाय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र देऊन स्वस्त धान्य दुकानातील धान्य पुरवठाही रोखला जाणार आहे. पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना तातडीने पत्र तयार करून ते संबंधित विभागाला पाठविण्याचे आदेशही दिल्याचे खेबूडकर म्हणाले.