शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही

By admin | Updated: May 8, 2017 04:08 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार २०१७’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला प्रदान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष रवींद्र साताळकर, कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष शाहू छत्रपती, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह आनंद भिडे उपस्थित होते.गडकरी म्हणाले, देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी १५ टक्के पाणी आपण अडवितो, १५ टक्के पाणी जमिनीत मुरते तर उर्वरित ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जाते. वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडविता आले पाहिजे. नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या पुलांचे चेक डॅम बनविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी अडविता येऊ शकेल. नागपूर शहराचे सांडपाणी आम्ही विकून वर्षाला १८ कोटींचा महसूल मिळवीत आहोत. इतर शहरांनीही सांडपाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पुणेकरांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बांधकामासाठी वापरता येईल का याकडे लक्ष द्यावे असे गडकरी म्हणाले. वीज प्रकल्पांसाठी यापुढे धरणातील पाणी न वापरता सांडपाणी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. पर्यावण आणि विकास यांचा योग्य तो समतोल साधला पाहिजे. सामाजिक, आर्थिक परिवर्तन राजकारणातून झाले नाही तर ते केवळ सत्ताकारण उरते असे त्यांनी सांगितले.१११ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करणारजलमार्ग बांधण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ब्रम्हपुत्रा आणि गंगा या दोन नद्यांच्या जलमार्गाचे काम अग्रक्रमाने पूर्ण करण्यात येत आहे. त्याचबरोबर देशातील १११ नद्यांवर जलमार्ग बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती गडकरींनी दिली.विद्वान जास्त असल्याने पुणे मागेनागपूरचा वेगाने विकास होऊ शकला; कारण नागपुरात नेते अन् विद्वानही कमी आहेत. पुण्यात मात्र नेते आणि विद्वानांची संख्या जास्त असल्याने इथले विकास प्रकल्प रखडत असल्याचे सांगत गडकरी यांनी पुणेकर राजकारण्यांना आणि स्वयंसेवी संस्थांच्या विद्वानांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.