शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आधीच देशात इतकी रोगराई, त्यात आणखी वाढ... काय फरक पडतो?; 'कोरोना'वरून राज ठाकरेंची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 13:04 IST

कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असं लोकांनी मला सांगितलं. मी म्हटलं...

ठळक मुद्देमनसेनं शिवजयंतीचा सण धूमधडाक्यात साजरा केला आहे. औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनीही उपस्थिती दर्शवली आहे. तसेच संध्याकाळी शोभायात्राही काढली जाणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कोरोना व्हायरसवर भाष्य केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल. कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असं लोकांनी मला सांगितलं.

औरंगाबाद: मनसेनं शिवजयंतीचा सण धूमधडाक्यात साजरा केला आहे. औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनीही उपस्थिती दर्शवली आहे. तसेच संध्याकाळी शोभायात्राही काढली जाणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कोरोना व्हायरसवर भाष्य केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल. कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असं लोकांनी मला सांगितलं. मी म्हटलं, आधीच या देशात इतकी रोगराई आहे, त्यात आणखी एक वाढ, त्याने काय फरक पडतो, तुम्ही काळजी घेतली पाहिजे, याबद्दल काही प्रश्न आणि वाद नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. अशा कुठल्याही गोष्टीची लागण महाराष्ट्रात होता कामा नये. याची लागण काही जणांना झाली आहे, पण तेसुद्धा बरे होतील. स्वतःची तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. हा उत्सव तुम्ही दिमाखात साजरा कराल, संध्याकाळची शोभायात्राही मोठ्या थाटात पार पाडाल, मला याची खात्री आहे. त्याला कोणतंही गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या, असंही आवाहनही राज ठाकरेंनी मनसैनिकांना केली आहे. तसेच शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार यासंदर्भातही राज ठाकरेंनी परखडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे.शिवजयंती हा एक सण आहे, तो तिथीनुसारच साजरा व्हायला हवा. 365 दिवस शिवजयंती साजरी करायला हवी, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. कोरोनाबद्दल सर्वांनी काळजी घेण्याचंही त्यांनी आवाहन केलं आहे. आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे करतो. ते सर्वच्या सर्व सण तिथीनुसार साजरे करतो. आपण दिवाळी तारखेनुसार साजरी करत नाही. गणेशोत्सव हा तारखेनुसार साजरा करत नाही. आपला कुठलाच सण तारखेनुसार नसतो. प्रत्येक सण हा तिथीनुसारच साजरा केला जातो. आजचा दिवस महाराजांची जयंती ही कोणा एकाची जयंती नाही. ही महापुरुषाची जयंती आहे आणि तो आपला सण आहे. त्यामुळे तो सणासारखाच साजरा झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे