शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत निम्म्याही शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 03:18 IST

३१ मेची डेडलाइन हुकली; शिक्षक बदल्या करताना शिक्षण विभागाची दमछाक

अविनाश साबापुरेयवतमाळ : शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ३१ मेपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र शिक्षकांचे शंभर टक्के मॅपिंग जून उजाडल्यावरही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बदल्यांचे प्रत्यक्ष आदेश शिक्षकांच्या हाती पडण्यासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत १ लाख ८७ हजार ७२३ शिक्षकांपैकी फक्त ६५ हजार ८१० शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

शिक्षकांचे मॅपिंग झाल्यावरच राज्यातील किंवा एखाद्या जिल्हा परिषदेतील बदलीपात्र शिक्षक आकडा निश्चित होणार आहे. मॅपिंग करताना जिल्हा परिषदेची यंत्रणा शिक्षकाचा प्रथम नियुक्ती दिनांक, सध्याच्या शाळेत तो किती वर्षांपासून कार्यरत आहे, त्याच्यावर कधी निलंबनाची कारवाई तर झालेली नाही ना, त्याचे सध्याचे वय किती आहे, अशा प्रकारची माहिती संकलित करीत आहे. एकदा ही यादी झाली, तरच संवर्ग १, २ मधील कर्मचाऱ्यांचीही माहिती स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या एकाही जिल्हा परिषदेने शंभर टक्के शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण केलेले नाही.

२६,८४७ शिक्षकांचे काय?आॅनलाइन बदली प्रक्रियेत प्रत्येक शिक्षकाचे मॅपिंग होणे गरजेचे आहे. असे असतानाही राज्यातील २ लाख १४ हजार ५७० शिक्षकांपैकी केवळ १ लाख ८७ हजार ७२३ शिक्षकांचे मॅपिंग केले जात आहे. त्यामुळे उर्वरित २६ हजार ८४७ शिक्षकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, निलंबित असलेले शिक्षक, विनाअर्ज सुटीवर असलेले शिक्षक, ५३ वर्षापेक्षा अधिक वय असलेले शिक्षक मॅपिंगमधून वगळले गेले आहेत. मात्र, मॅपिंगपूर्वीच अशा शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाला मिळाली असेल, तर मोठ्या प्रमाणात मॅपिंग कशाला केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सातारा जिल्हा परिषद आघाडीवरसातारा जिल्हा परिषदेने ७ हजार ६३६ पैकी ७ हजार ६०४ शिक्षकांचे मॅपिंग करून ९५ टक्के काम पूर्ण केले आहे. त्याखालोखाल भंडारा ८९, नंदुरबार ८५, वर्धा ५९, कोल्हापूर ५१, यवतमाळ ३७, परभणी ३३, नांदेड ३३, उस्मानाबाद ३३, गडचिरोली ३०, सांगली २३, तर अहमदनगर जिल्हा परिषदेने २२ टक्के शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण केले आहे.राज्यातील उर्वरित जिल्हा परिषदांनी २० टक्केही काम पूर्ण केलेले नाही. विशेष म्हणजे, अकोला, धुळे, हिंगोली, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, जालना, लातूर, बिड जिल्हा परिषदेत १ जूनपर्यंत मॅपिंगचे काम शून्य टक्के झालेले आहे.