शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबईची पीछेहाट..

By admin | Updated: May 4, 2017 22:29 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई महापालिकेला नापास झालील आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयमार्फत नुकत्याच झालेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबई २९ व्या क्रमांकावर फेकली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - केंद्र सरकारच्या स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई महापालिकेला नापास झालील आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयमार्फत नुकत्याच झालेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबई २९ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराने मुंबईला मागे टाकत आठवा क्रमांक पटकावला आहे. तर स्वच्छतेच्या मोहिमेत अशी पीछेहाट झाल्याने मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा करणारी महापालिका प्रशासन तोंडघशी पडली आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत महापालिकेने स्वच्छेसाठी अनेक उपक्रम सुरु केले. स्वच्छतेच्या अजेंडयावर मुंबई हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले. या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियानेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईचा दौरा केला. त्यावेळीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने स्वच्छतेचे दर्शन या पथकाला घडवले. ही स्वच्छता कायम ठेवण्यासाठी विभागात नियमित फेरफटका मारून स्वच्छतेची खातरजमा करण्याची ताकीदही प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना दिली होती. तसेच स्वच्छतेचा दूत म्हणून प्रसिद्ध अभिनेता सलमान खानलाही या मोहिमेत उतरवण्यात आले. 
 
काही दिवसातच मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे महापालिका प्रशासन घाईघाईने जाहीर करून मोकळे झाले. मात्र लोकसंख्याच्या तुलनेत शौचालयांचा अभाव असल्याने आजही मुंबईत काही भागांमध्ये उघड्यावरच प्रातःर्विधी उरकणारे दिसून येत आहेत. त्याचबरोबर ओला व सुका कचरा मोहिमेकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ, कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची मंदगती, देवनार कचराभूमीवर सतत लागणाऱ्या आगी आणि नालेसफाई मोहिमेचे तीनतेरा यामुळे स्वच्छतेत महापालिकेची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेले मुंबई शहर २९ व्या क्रमांकावर पोहचले आहे. त्याचवेळी मुंबईच्या तुलनेत छाेटेसे शहर असलेले नवी मुंबई गतवर्षीच्या 12 व्या क्रमांकावरून थेट आठव्या क्रमांकावर पाेहाेचले आहे. प्रतिनिधी 
म्हणून स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबईची पीछेहाट.. 
 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेने मुंबई शहराचा जागतिक दर्जा टिकवण्यासाठी स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे. यासाठी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठ्याप्रमाणात तरतूदही वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रयोग फेल जात असल्याने मुंबईची कचराकुंडी झाली आहे. या मोहिमांमध्ये नागरी सहभाग मिळ्वण्यातही पालिकेच्या पदरात अपयशच पडले आहे. परिणामी केंद्राच्या परीक्षेत मुंबई महापालिकेची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. 
 
स्वच्छता माेहिमेचे अपयश...
*कचरा टाकण्यासाठी जागा नाही.... मुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो. मात्र बेस्ट आऊट ऑफ वेस्टचे महापालिकेचे प्रयत्न फेल गेल्याने कचराभूमींवर आज कचऱ्याचे डोंगर आहेत. कचराभूमीवरील हा भार कमी करण्यातही महापालिका अपयशी ठरली आहे. सद्यस्थितीत देवनार व मुलुंड कचराभूमीला टाळे लावण्याची वेळ आली आहे. त्यात देवनार कचराभूमीवरील सततच्या आगीने स्थानिकांचे आराेग्य बिघडले आहे. तळाेजा येथील जागा कचराभूमीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू हाेणे हीच यातील जमेची बाजू आहे.
 
* कचरा पुर्नप्रक्रिया प्रकल्प...कचरा टाकण्यासाठी जागा मिळत नसल्याने काळाची गरज म्हणून कचरा पुर्नप्रक्रिया प्रकल्प पालिकेने हाती घेतला. त्यानुसार देवनारमध्ये चार हजार आणि कांजूर मार्गमध्ये दाेन हजार मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया हाेणार हाेती. मात्र या प्रकल्पाने आघाडी घेतलेली नाही. विभागस्तरावर कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा प्रकल्पही थंडावलाच. त्यामुळे कच-याचा ढिग व मुंबईवर कच-याचा भार वाढतच गेला.
 
* आेला व सुका कचरा वर्गीकरण माेहीम ...आेला व सुका कचरा एकत्रच कचराभूमीवर वर्षाेंवर्षे जात आहे. त्यामुळे सुका कचरा, इलेक्ट्राँनिक कचरा वेगळा करून त्यावर पुर्नप्रक्रिया करण्यासाठी आेला व सुका कचरा वर्गीकरण माेहीम 2006 मध्ये आली. ही माेहीम यशस्वी करण्यासाठी प्राेत्साहनपर याेजना, लाेक प्रबाेधन, दंडात्मक कारवाई असे सर्व प्रयाेग झाले. मात्र आेला व सुका कच-यासाठी कच-याचे स्वतंत्र डबे, नाक्यानाक्यावर कच-याचे डबे बसविण्यात पालिकेला अपयश आले.
 
* हागणदारीमुक्त मुंबई... जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात आजही अनेक ठिकाणी झाेपडपट्टीतील रहिवाशांना शाैचालयाअभावी उघड्यावरच जावे लागते. हे चित्र बदलण्याचा विडा महापालिकेने उचलला. अभिनेता सलमान खान या माेहिमेचा दूत बनला. मात्र त्याचे वडील व प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी बांद्रा येथील त्यांच्या घरासमाेरील शाैचालयास विराेध केला आहे. हागणदारीमुक्त मुंबई ही माेहीम यशस्वी झाल्याचे महापालिकेने राज्य सरकारच्या नगर विकास खात्याला लगबगीने कळविलेही. याची शहनिशा करण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाला स्वच्छच ठिकाण दाखविण्याची अधिका-यांची धडपड सुरू हाेती. मात्र राज्य सरकारने या माेहिमेचे खरे रूप केंद्रासमाेर मांडल्याचे समजते.
 
* सार्वजनिक शाैचालयांचा अभाव 
स्वच्छ भारत अभियानच्या नियमानुसार प्रत्येक 30 जणांमागे एक शाैचकुपी असावी. 
 
*मुंबईत झोपडपट्टीमध्ये राहणा-या 63टक्के लाेकांसाठी एक लाख 63हजार शाैचकुपी असणे अपेक्षित आहे. 
 
*मात्र मुंबईत 60 हजार शाैचकुपी कमी आहेत.