शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् त्यांच्या आयुष्यातील धूर विरला !

By admin | Updated: March 26, 2017 17:28 IST

जिल्ह्यातील मागासलेली ४२ हजार ५५१ कुटुंबे अनुदान आणि विनातारण कर्जावर निर्धूर झाली आहे.

हरी मोकाशे/ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 26 - ज्या कुटुंबात अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याची मारामार आहे, अशा दारिद्र्यरेषेखालील, आर्थिकदृष्ट्या मागास असलेले कुटुंब निर्धूर कसे असणार? स्वयंपाक करायचा म्हटले की, चुलीला लाकडाची गरज आलीच. चटकन् चूल पेटविण्यासाठी डोळे चोळत तोंडाने फुंकर घालण्याची झालेली नित्याची सवय. आता या सवयीला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेने बगल दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागासलेली ४२ हजार ५५१ कुटुंबे अनुदान आणि विनातारण कर्जावर निर्धूर झाली आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची माहिती क्षणार्धात खेड्यातील व्यक्तींनाही मिळू लागली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तीही मोबाईल हाताळत असल्याचे दिसत आहे. पण त्यांच्या कुटुंबात एखादा पै पाहुणा आला की, त्याला चहा, नाश्ता अथवा भोजन बनविण्यासाठी चूल पेटवावी लागते. त्यासाठी गृहिणींची सुरू असलेली खटपट आणि डोळ्यांना होणारा त्रास आलाच. ग्रामीण भागातही वृक्ष संवर्धन व्हावे आणि प्रत्येक कुटुंब निर्धूर व्हावे, यासाठी गेल्या अकरा महिन्यांपासून देशात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे.या योजनेसाठी सन २०११च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांची निवड करण्यात आली. लातूर जिल्ह्यात अशी ६८ हजार २४३ कुटुंबे आढळली. या कुटुंबांकडून योजनेसाठी प्रस्ताव घेण्यात आले. त्यात ५४ हजार ४३७ प्रस्ताव पात्र ठरले. त्यातील ४४ हजार ४८२ कुटुंबांच्या प्रस्तावांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि त्यातील ४२ हजार ५५१ कुटुंबांना अनुदान आणि विनातारण कर्जावर गॅस देण्यात आले आहेत. कुटुंबास १६०० रुपयांचे अनुदान... या योजनेअंतर्गत गॅस घेण्यासाठी सिलिंडर व रेग्युलेटरची अनामत रक्कम, बसविण्याची आणि नोंदणीची रक्कम घेतली जात नाही. त्यामुळे योजनेअंतर्गतच्या प्रत्येक कुटुंबास जवळपास १६०० रुपयांचे अनुदान मिळते. ही रक्कम केंद्र सरकार स्वत: भरत आहे. कर्जाची परतफेड सुलभ... या योजनेअंतर्गत गॅस घेण्यासाठी रिफिल, शेगडी व शंभर रुपयांचा मुद्रांक आवश्यक आहे. या सर्वांची साधारणत: किंमत १७०० रुपये आहे. ही रक्कम लाभार्थी तात्काळ भरू शकतो अथवा त्यासाठी कर्ज घेऊ शकतो. या कर्जाची परतफेडही सिलिंडरच्या अनुदानातून वजा केली जाते. राज्यात लातूर आघाडीवर... प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत राज्यात लातूर जिल्हा प्रथम स्थानावर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार ५५१ कुटुंबांंना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दुसऱ्या स्थानावर बीड जिल्हा असून, ३७ हजार कनेक्शन देण्यात आले आहेत. तर तिसऱ्या स्थानावर नांदेड असून, ३६ हजार कनेक्शन्स देण्यात आले आहेत. ३३ हजार ४४० जणांना कर्ज... जिल्ह्यातील ४२ हजार ५५१ पैकी ३३ हजार ४४० जणांनी कर्जाद्वारे हा गॅस घेतला आहे. कर्जाच्या परतफेडीची सुविधा सुलभ असल्याने कुठलीही अडचण येत नसल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक आनंद घोडके यांनी दिली. समन्वयामुळे राज्यात आघाडी़लातूर जिल्ह्यातील ५० हजार मागासलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दीष्ट होते़ प्रशासकीय अधिकारी व लाभार्थ्यांच्या समन्वयामुळे अवघ्या सहा महिन्यात ४२ हजार ५५१ कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे़ राज्यात आपले काम सर्वात चांगले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी दिली़