शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गितेंच्या निमंत्रणावरून धुसफुस

By admin | Updated: November 6, 2014 04:03 IST

माजी आमदार वसंत गिते यांचा प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ मंजूर केला.

नाशिक : माजी आमदार वसंत गिते यांचा प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ मंजूर केला. परंतु त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने भाजपा आणि शिवसेनेत अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. गिते यांनी राजीनामा देताच आधी भाजपा आणि त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. तथापि, भाजपाच्या देवयानी फरांदे आणि गिते यांच्यात सख्य नाही. पूर्वी गिते आणि देवयानी यांचे पती सुहास फरांदे यांचे मैत्रीचे संबंध होते; मात्र महापालिकेत सेना-भाजपा युती सत्तेत असताना स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेविका शीला भागवत यांच्या कथित अपहरण प्रकरणावरून फरांदे-गिते यांच्यात वितुष्ट झाले. शिवसेनेतही गिते आले तर शहर आणि जिल्हाप्रमुखपदावर दावे सांगू शकतात, या शक्यतेने संपर्कप्रमुख रवींद्र्र मिर्लेकर यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यांनी संबंधितांची कानउघडणी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच गितेंची भेट घेणाऱ्या अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी, आपण गिते यांना व्यक्तिगत संबंधातून भेटण्यास गेलो होतो. पक्षात कोणाला निमंत्रित करण्याचा आपल्याला अधिकार नाही, त्यामुळे कोणाला निमंत्रितही केले नसल्याची सारवासारव केली आहे. त्यामुळे गिते यांना पक्षात घेण्यास भाजपा-सेना इच्छुक असल्याचे भासवले जात असले, तरी प्रत्यक्षात तशी स्थिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)