शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट फोन’चा अतिवापर आरोग्यास घातक

By admin | Updated: March 3, 2016 01:42 IST

आपल्या व्यवसाय, नोकरीच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यासाठी, तसेच शिक्षण, मनोरंजनासाठी व आप्तेष्टांशी संवादासाठी स्मार्ट फोन अत्यंत उपयुक्त आहे

पुणे : आपल्या व्यवसाय, नोकरीच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यासाठी, तसेच शिक्षण, मनोरंजनासाठी व आप्तेष्टांशी संवादासाठी स्मार्ट फोन अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, स्मार्ट फोनच्या अतिवापराचे व्यसन अत्यंत धोकादायक असून, त्यातून विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन तंत्रज्ञानलेखक सुश्रुत कुलकर्णी यांनी केले.मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व पिंपरी-चिंचवड येथील सायन्स पार्कच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘स्मार्ट फोनचे अंतरंग’ या विषयावर सुश्रुत कुलकर्णी बोलत होते. याप्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, संजय मालती कमलाकर, विलास रबडे, सायन्स पार्क येथील शिक्षणाधिकारी नंदकुमार कासार, सुनील पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.सुश्रुत कुलकर्णी म्हणाले, की स्मार्टफोनमध्ये संवाद, शिक्षण, वाचन, नोंदी ठेवणे, महिला सुरक्षा, मनोरंजन, खरेदी-विक्री यासंबंधित अनेक चांगली अ‍ॅप्स आहेत. या सगळ्यात फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपसारखी सोशल माध्यमे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. तरुणपिढीसह स्मार्टफोन वापरणारे सगळेच या अ‍ॅप्सचा वापर करताहेत. परंतु, कोणत्याही गोष्टीचे फायदे असतात, तसे तोटेही असतात. स्मार्टफोनचा सतत वापर केल्यास एकटेपणा, निराशा संभवते. बॅटरी उतरण्याचे प्रकार होतात. वेळेपेक्षा अधिक चार्जिंग केल्यास बॅटरी फुगणे व त्यातून अपघात घडण्याचेही प्रकार होतात. त्यामुळे गरजेपुरता आणि चांगल्या कामांसाठीच स्मार्टफोनचा वापर केला पाहिजे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास रबडे यांनी केले. नंदकुमार कासार यांनी आभार मानले.> स्मार्टफोन घेण्यापासून ते वापरताना काय काळजी घ्यावी, अ‍ॅप्स कशी इन्स्टॉल करावीत, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप ही सोशल माध्यमे कशी वापरावीत, इंटरनेट डेटापॅक कसा पुरवावा आदी गोष्टींविषयी कुलकर्णी यांनी सखोल मार्गदर्शन केले. नागरिकांच्या अनेक शंकाचे निरसन त्यांनी केले.