शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्मार्ट पार्किंग

By admin | Updated: July 23, 2016 03:22 IST

ठाणेकर नागरिकांना मोबाइल अ‍ॅपच्या एका टचवर शहरात कुठे पार्किंग उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात स्मार्ट पार्किंग व्यवस्था निर्माण व्हावी आणि ठाणेकर नागरिकांना मोबाइल अ‍ॅपच्या एका टचवर शहरात कुठे पार्किंग उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल पार्किंग सर्व्हिसेसचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात महत्त्वाकांक्षी योजनेविषयी चर्चा झाली असून आॅगस्ट महिन्यातील महासभेमध्ये याविषयीचा प्रस्ताव सादर होणार आहे.शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या आॅन रोड आणि आॅफ रोड पार्किंगची माहिती या यंत्रणेच्या माध्यमातून अ‍ॅपवर मिळणार आहे. तसेच त्या ठिकाणी किती पार्किंग जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी पार्किंगचे दर काय आहेत, याची माहितीही अ‍ॅपवर मिळणार आहे.सुरुवातीस ज्युपिटर हॉस्पिटल येथील मोकळ्या भूखंडावर तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही स्मार्ट पार्किंग यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त संदीप माळवी, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, विकास ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)>अ‍ॅपवरूनच देणार पार्र्किं गची फीया यंत्रणेच्या माध्यमातून रस्त्यावरील पार्किंगचे व्यवस्थापन, मोबाइल अ‍ॅप याद्वारे शहरातील पार्किंगच्या माहितीसोबतच पार्किंगचे दर आणि त्या अ‍ॅप्सद्वारे पेमेंटची व्यवस्था असणार आहे, जेणेकरून वाहनधारकास त्याच्या अ‍ॅपवरूनच पार्किंगची फी देता येणार आहे. या यंत्रणेद्वारे शहरातील पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. ही संपूर्ण यंत्रणा जीपीआरएसशी कनेक्ट असल्याने याची सर्व माहिती नियंत्रण केंद्राद्वारे मिळण्याची व्यवस्था आहे. शिवाय, सर्वेलन्स व्यवस्था, दंड आणि जॅमरची व्यवस्थाही या यंत्रणेशी निगडित आहे.