शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ दलित गावांवरून सरकार ‘बॅकफूट’वर

By admin | Updated: December 16, 2015 03:11 IST

पहिल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्य शासनाची चांगलीच कोंडी केली. ‘स्मार्ट’ दलित गावांच्या

- योगेश पांडे, नागपूर

पहिल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्य शासनाची चांगलीच कोंडी केली. ‘स्मार्ट’ दलित गावांच्या योजनेची घोषणा होऊन चार महिने झाले असले तरी शासनाचे यासंदर्भात धोरण निश्चित झालेले नाही. या मुद्यावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलेल्या उत्तरामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही व राज्य शासनावर जोरदार हल्लाबोल केला. अखेर विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापतींना हा प्रश्न राखून ठेवावा लागला.राज्य शासनाने आॅगस्ट २०१५ मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील एका गावाचा ‘स्मार्ट’ दलित गाव म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात रामराव वडकुते, ख्वाजा बेग, अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाकडून या योजनेची घोषणा करण्यात आली असून याअंतर्गत गावातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, अद्ययावत वाचनालय, कम्युनिटी हॉल इत्यादी बाबींवर विशेष भर देण्यात येईल, असे राजकुमार बडोले यांनी स्पष्ट केले. एक हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांची यासाठी निवड करण्यात येईल व यासाठी प्राथमिकदृष्ट्या २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप याचे धोरण अंतिम झालेले नाही अशी माहिती त्यांनी दिली.ही योजना घोषित होऊन चार महिने झाले. परंतु तरीदेखील यासंदर्भातील धोरण तयार झालेले नाही. याचा आराखडा सरकारकडे उपलब्ध का नाही यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रामराव वडकुते यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जर सरकारकडे या योजनाचा मसुदाच तयार नाही तर २० कोटी रुपये कशासाठी ठेवले आहेत असा प्रश्न उपस्थित करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करून ही योजना तयार करण्यात आली असून अद्याप मसुदा तयार न होणे हा त्यांचा अपमान असल्याची टीका मुंडे यांनी केली. विरोधकांनी सभागृहात यावरून सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली व काही वेळ गोंधळ निर्माण झाला. मंत्र्यांकडे याचे कुठलेही ठोस उत्तर नसल्याने ते ‘बॅकफूट’वर गेल्याचे स्पष्ट झाले. अखेर सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी हा प्रश्न राखून ठेवण्याचे निर्देश दिले.राज्य शासनाने ‘स्मार्ट’ दलित गावांच्या योजनेबाबत ९ आॅक्टोबर २०१५ रोजी शासन निर्णय काढला होता. परंतु याचा कुठलाही मसुदा तयार झालेला नाही. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार यात जी कामे करण्यात येणार आहेत, ती कामे अगोदरच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत घेण्यात येतात.