शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील उर्वरीत 8 शहरात स्मार्ट सिटीचे काम सुरु - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: June 25, 2016 17:59 IST

महाराष्ट्रातील उर्वरीत आठ शहरांमध्येही स्मार्ट सिटीचे उपक्रम राबवण्यास आधीच सुरुवात केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 25 - स्मार्ट सिटी योजनेमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे निवडण्यात आलेली असली तरी उर्वरीत आठ शहरांमध्ये स्मार्ट सिटीचे उपक्रम राबवण्यास आधीच सुरुवात केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ते बोलत होते. या शहरांसाठी आर्थिक मदत देण्यास जगभरातील अनेक देश उत्सुक आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने मदत करावी असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले. 
 
फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटीमुळे सेवा आणि व्यवस्था पारदर्शी व गतीमान होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत. यासोबतच समाजाच्या सर्व स्तरांना आणि विशेषत: गरीबांना स्थान मिळतेय. आजवर श्रीमंतांना सेवा मिळत आली आहे. मात्र, आता सर्वसामान्य आणि गरिबांनाही सेवा मिळणार आहे. त्यांचा विकास होईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. शहरात इंफ्रास्ट्रकचर तयार करणारा कार्यक्रम नाही तर ट्रान्सफॉर्म करणारा कार्यक्रम, तरुणांना रोजगार मिळणार. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमासाठी पुण्याला निवडले त्यासाठी आभारी आहे. जगातल्या स्मार्ट लोकांमध्ये पुण्यातल्या लोकांचा समावेश आहे. गेल्या 50 वर्षांपासून शहरीकरणाला शाप मानून आपण चाललो. ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणावर शहराकडे लोक आले आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करु लागले. शहरीकरणाला आपण संधी मानत स्मार्ट सिटीसारखी नवी संकल्पना कार्यान्वित केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
नाशिक महापालिकेत पंतप्रधान मोदी यांचे लाइव भाषण ऐकन्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महापौर यांचेसह केवळ चार नगरसेवक उपस्थित होते. मनपा कर्मचारी मात्र आदेशामुळे हजर होते.
 
 
पुण्यात स्मार्ट सिटीचे उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण : वैंकय्या नायडू
 
पुणे : पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामधून स्मार्ट सिटीचे होत असलेले उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण आहे. आपण एक देश आहोत. ही टीम इंडिया आहे. एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही असे मत केंद्रिय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
स्मार्ट म्हणजे सुटबुट,हॅट नव्हे, तर सर्वसामान्याचे जीवन सुसह्य बनवणे आहे. शहरातील जीवनमान सुधारणे म्हणजे स्मार्ट सिटी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे सांगणा-या लोकमान्य टिळकांपासून, स्वा. सावरकर, महात्मा फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, संत तुकाराम, पंढरपुर सर्वांचे मुख्य केंद्र पुणे राहीले आहे. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन काम करावे, प्रत्येकाने योगदान द्यावे.  ‘सब काम सरकार करेगा हम बेकार बैठेगा’ ही मानसिकता बदलून सर्वांनी स्वत:ची जबाबदारी पार पाडण्याचे आवाह नायडू यांनी केले. नविन कल्पना, नविन मार्गदर्शन घेऊन देश पुढे जात आहे. सबका साथ सबका विकास हा नारा पंतप्रधानांनी दिला आहे. जोपर्यंत शेवटच्या घटकाचे उत्थान होणार नाही तोपर्यंत देशाचे उत्थान होणार नाही. गरिबांसाठी घरे निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. 
पुणेकर शांत, विचारशील, विकासाला साथ देणारे आहेत. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी म्हणजे  ‘मेकिंग आॅफ डेव्हलपेंट इंडीया’ असेही त्यांनी ठणकावून सांगत पंतप्रधानांचे कौतुक केले.