शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये ‘स्मार्ट सिटी’ कळीचा मुद्दा

By admin | Updated: January 21, 2017 00:33 IST

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील २० शहरांची २८ जानेवारी २०१६ रोजी घोषणा केली.

राजकुमार सारोळे,

सोलापूर- केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील २० शहरांची २८ जानेवारी २०१६ रोजी घोषणा केली. त्यात नवव्या क्रमांकाने महाराष्ट्रात गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचा समावेश झाला. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश होऊन वर्ष लोटले तरी एकाही कामाला सुरुवात न झाल्याने मनपा निवडणुकीत हा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. केंद्र शासनाच्या पहिल्या स्मार्ट २० शहरांच्या यादीत स्पर्धेचे ६०.३० टक्के गुण मिळवून सोलापूर शहर नवव्या क्रमांकावर आले. स्मार्ट सिटी योजनेमुळे पायाभूत सुविधांसाठी खास निधी उपलब्ध होणार असल्याने गिरणगावची वाटचाल विकासाच्या दिशेने होणार, अशी आशा निर्माण झाली. योजनेचे २८३ कोटी रुपये मनपाच्या खात्यावर आले; पण स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी, त्याचे संचालक मंडळ व त्याला सभेची मंजुरी आणि बैठकांत वेळ गेला. त्यामुळे अपेक्षित कामांना सुरुवात करता आली नाही. सध्या स्मार्ट सिटी प्रस्तावातील सर्व कामांचे प्रकल्प अहवाल तयार आहेत. टेंडरना मंजुरी नसल्याने आता निवडणुकीनंतर ही कामे सुरू होतील. पण प्राधान्याने कोणते प्रकल्प हाती घेतले, याकडे लक्ष वेधल्यास निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनणार आहे. लोकांचे आहे ते प्रश्न तसेच भिजत पडले आहेत. पाणी, रस्ते, कचरा संकलन या समस्यांवर मात करण्यात अपयश आल्याने समार्ट सिटीचे गाजर महागात पडणार आहे. >या कामाला दिले प्राधान्यकेवळ अमृत योजनेतून निधी मंजूर झालेल्या किल्लाबाग सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प पुरातत्त्व खात्याच्या मंजुरीत अडकला आहे. रंगभवन ते भैया चौक हा रस्ता स्मार्ट करण्याचा प्रकल्प अहवाल करण्यात येत आहे. वास्तविक, पाणी आणि कचरा संकलन या प्रकल्पाला प्राधान्य देणे गरजेचे होते.