मुंबई : आता स्मार्ट कार्डचे आॅनलाइन रिचार्ज करण्याचा निर्णयही मेट्रोने घेतला आहे. ही सेवा तत्काळ सुरू केली जात असल्याचे मुंबई मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. रिचार्ज केल्यानंतर त्याचा भरणा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डमधून होणार असून, यासाठी ५0 बँकांशी संलग्न करणार असल्याचे मेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितले. या सुविधेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार नाही. रिचार्जसाठी ६६६.१ी’्रंल्लूीे४ेुं्रेी३१ङ्म.ूङ्मे वर लॉग आॅन करावे लागेल व त्यानंतर ट अूूङ्म४ल्ल३ वर क्लिक करून नंतर कल्ल२३ंूँं१ॅी वर क्लिक करावे लागेल. मग स्मार्ट कार्डच्या मागे असलेला युनिक सीएससी नंबर टाकून त्यानंतर रिर्चाजची किंमत नमूद करावी लागेल. हे रिचार्ज क्रेडिड कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग कशा प्रकारे करणार हे नमूद करून रिचार्ज करून घ्यावे, असे मेट्रोकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
स्मार्ट कार्डचे आॅनलाइन रिचार्जही होणार !
By admin | Updated: December 26, 2014 04:31 IST