शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

हरभ-याच्या भावात अल्प प्रमाणात वाढ

By admin | Updated: February 13, 2016 01:46 IST

तुर सरासरी ८0५0 क्विंटल; मुगाचे दर तीन हजाराने घटले.

अकोला : पावसाच्या कमतरतेमुळे खरीप, रब्बी पिकांना प्रचंड फटका बसला असून, उत्पादन प्रचंड घटल्याने, यावर्षी धान्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा होती; पंरतु बाजारात दर कमीच आहेत. शुक्रवारी हरबर्‍यांच्या दरात किंचीत सुधारणा झाली असली तरी सोयाबीनचे दर जैसे थे आहेत.सोयाबीनचे दर वाढतील या प्रतिक्षेत काही शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन अखेर विक्रीस काढले आहे. यावर्षी खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घटले आहे. मूग, उडिदाचे पीक पूर्णत: हातचे गेले असून, सोयाबीनचा उतारा एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंतच आला आहे. कापसाचे उतारा मोजक्या ठिकाणी एकरी पाच ते सात क्विंटलपर्यंत आले आहे. कोरडवाहू क्षेत्रात मात्र हा उतारा एकरी एक ते दीड क्विंटलच आहे. तुरीचे उत्पादनही घटले आहे. दरम्यान, मागील पंधरवड्यात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे हेच दर ७ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. शुक्रवारी या दरात ५00 रू पये वाढ झाली आहे. पंरतु प्रतवारी बघून दर ठरले जात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सोयाबीनच्या दर मागच्या महिन्यात सोयाबीनचे दर ३२00 ते ३५00 रुपये प्रतिक्विंटल होते. या दरात चढ उतार सुरू असून, शुक्रवारी हे दर ३,३३५ ते ३,५५0 रू पये प्रतिक्विंटलपर्यंत पोहाचले आहेत. मुगाचे दर घसरले असून, ६,२५0 रू पये प्रतिक्विंटल झाले आहेत. हे दर ९ हजार रू पयापर्यंत पोहोचले होते. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील तुरीची आवक दररोज केवळ ४,४0१ क्विंटलवर येऊन ठेपली असून, सोयबीनची आवक तर २,५७५ क्विंटल आहे. या भागात तूर व सोयाबीनचे पीक सर्वाधिक घेतले जाते. याच भागात या दोन्ही पिकांची आवक घटली आहे. मुगाची आवक केवळ ५ क्विंटल तर उडिदाची आवक केवळ ३ क्विंटल आहे.