शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

झोपडपट्टी पुनर्वसन अखेर बारगळले

By admin | Updated: June 27, 2016 01:33 IST

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत दळवीनगर झोपडपट्टीमधील नागरिकांना हक्काची घरे मिळण्याचे स्वप्न धूसर झाले आहे

चिंचवड : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत दळवीनगर झोपडपट्टीमधील नागरिकांना हक्काची घरे मिळण्याचे स्वप्न धूसर झाले आहे. अनेक आश्वासनानंतरही हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नसल्याने प्रभागातील नागरिक नाराज आहेत.या प्रभागात वेताळनगर, मोरयानगर झोपडपट्टीचाही भाग समाविष्ट आहे. मात्र येथेही मूलभूत सुविधांचा अभाव आहे.या प्रभागात शहरातील पहिल्या वॉर्ड सेंटर प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मात्र, आरक्षित भूखंड विकसित झाले नाहीत. हे भूखंड ताब्यात घेतले असून, लवकरच कामे पूर्ण करणार असल्याचे सांगितले जात आहे.कामदा हौसिंग सोसायटी, संतोषनगर, उद्योगनगर, दळवीनगर,भोईरनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क हा महत्त्वाचा रहिवासी भाग या प्रभागात येतो. मात्र येथील मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही ही मुख्य समस्या आहे. उद्योगनगरमधील महाराष्ट्र कामगार मंडळाच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत असणारे मैदान आठ वर्षांपासून बंद झाले. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांना तात्पुरते पत्राशेड टाकण्यात आले होते. यामुळे येथील मैदान बंद झाले आहे. भोईरनगर चौकात असणाऱ्या भाजी मंडईचे स्थलांतर अद्याप झालेले नाही. यामुळे येथील समस्या गंभीर झाली आहे. भाजीविक्रेते रस्त्यावर थांबत असल्याने वाहतूककोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे.प्रभागात पुरेशी स्वच्छतागृह नाहीत. जी आहेत त्यांची दुरवस्था झाली आहे. भोईरनगर चौकातील स्वच्छतागृह काढण्यात आले. मात्र, ते पुन्हा बसविण्यात आले नाही.प्रभागात विद्युत केबल भूमिगत करण्याचे काम सुरू केले. मात्र, अद्यापपर्यंत काही भागातील कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. प्रभागात २४ तास पाणी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत ते पूर्ण झालेले नाही. संतोषनगर, प्रेमलोक पार्क भागात कचराकुंड्या वेळेवर साफ होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. पादचारी मार्गांची कामे अर्धवट झाली आहेत. झोपडपट्टी भागात वेळोवेळी साफ-सफाई होत नाही. (वार्ताहर)सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी यासाठी कामे झाली आहेत. वॉर्ड सेंटरचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. पांढरकर कॉलनीत प्राथमिक शाळा, सुसज्ज उद्यान व स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. स्वच्छ भारत अभियान प्रकल्प राबविला आहे. प्रेमलोक पार्कमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा सुरू झाली आहे. आरक्षित भूखंड ताब्यात घेतले आहेत. - शमीम पठाण, नगरसेविका।प्रभागात रस्त्यांची कामे केली आहेत. पादचारी मार्गाचेही काम झाले आहे. प्रेमलोक पार्कमध्ये विरंगुळा केंद्र सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉलची व्यवस्था केली आहे. वॉर्ड सेंटरचे काम सुरू केले आहे. झोपडपट्टी भागात सुलभ स्वच्छतागृहाची कामे झाली आहेत. रस्त्याचे सुशोभीकरण झाले आहे.- गणेश लोंढे, नगरसेवक