शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला लागलीय गळती

By admin | Updated: August 10, 2016 01:50 IST

मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि आगामी २५ वर्षांसाठी भाषेचे धोरण

पुणे : मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि आगामी २५ वर्षांसाठी भाषेचे धोरण तयार करण्याच्या घोषणा देणाऱ्या राज्य शासनाचे राज्यातील ‘मराठी’कडे दुर्लक्ष होत आहे. मराठीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अपयशामुळे राज्यात दरवर्षी ७ ते १४ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात ‘मराठी’ला गळती लागली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘मराठी’ची धुरा ज्या युवा पिढीच्या हाती सोपवायची, तीच पिढी ‘मराठी’पासून दुरावत चालल्याने महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मराठी विभाग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे मराठीचे अध्यापन करणाऱ्या डॉ. राजेंद्र थोरात यांनी राज्यातील महाविद्यालयीन स्तरावरील मराठीच्या स्थितीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून मराठी भाषेच्या विद्यार्थी गळतीची ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत डॉ. थोरात यांनी वैयक्तिक संपर्क, सोशल मीडिया व अन्य संपर्कसाधनांचा वापर करून राज्यभरातील मराठी भाषेचे महाविद्यालयीन पातळीवरचे विद्यार्थी, त्यांची संख्या, वर्ग, शिक्षक, संशोधन, भाषाविषयक उच्च शिक्षण आदी विविध मुद्यांवर युवा पिढीशी संवाद साधला, तसेच महाविद्यालयीन पातळीवर उपलब्ध आकडेवारीची तपासणी केली, त्यातून दरवर्षी मराठी भाषेचे सुमारे ७०० ते १४०० विद्यार्थी कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. ओतूर, नारायणगाव येथील महाविद्यालयांमधील मराठी विभाग बंद पडले आहेत. दरवर्षी विद्यार्थीसंख्येचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटत आहे ही चिंतेची बाब आहे, या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रयत्नात मराठीच्या सद्य:स्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने समोर आली आहे. े(प्रतिनिधी)