मुंबई : कष्टक:यांची ओळख असलेल्या मुंबापुरीतल्या बालकामगारांची संख्या हळूहळू का होईना आता कमी होऊ लागली आहे. प्रथमसारख्या सेवाभावी संस्थांसह आणि राज्य सरकारने या कामी घेतलेल्या पुढाकारामुळे बालमजुरीला काही अंशी का होईना आळा बसत असून, 1 नोव्हेंबर्पयतच्या पाहणीनुसार मुंबईत 1 हजार 375 बालकामगार असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.
उच्चभ्रू वा मध्यमवर्गीय कुटुंबातील पाल्यांसह आजी-आजोबांकडे पुरेसा वेळ असल्याने आणि घरची एकंदर परिस्थिती सुस्थितीत असल्याने त्यांच्या वाटय़ाला चांगले जगणो येते. परंतु जन्मापासून ज्यांच्या खांद्यावर कुटुंबाचे ओङो पडते अथवा लादले जाते; त्यांचे बालपण कोमेजून जाते. अशा अनेक कारणांमुळे बालमजुरीच्या खाईत लोटलेल्या बालकामगारांच्या सद्य:स्थितीवर ‘बालदिना’च्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाशझोत खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.
प्रथम संस्थेने जानेवारीमध्ये केलेल्या पाहणीनुसार, मुंबईत 4 हजार 654 बालकामगार आढळून आले होते. कालांतराने ही संख्या कमी होत असली तरी अधूनमधून यात कमीअधिक फरकाने वाढ होत असते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतून मोठय़ा प्रमाणात बालकामगारांची तस्करी होते. बेरोजगारी, गरिबी, मुंबईचे आकर्षण या कारणांनी अनेक बालकामगार मुंबईत येतात. त्यातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त बालकामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधून येतात. मुंबईसारख्या शहरांमध्ये गॅरेजेस, हॉटेल, कचराकुंडय़ा, बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम अशा ठिकाणी अल्पवयीन मुले काम करतात. अनेक मुली मोठय़ा प्रमाणात घरेलू कामगार म्हणून काम करतात. शिवाय महिला जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या लहान कारखान्यांतून कंत्रटी पद्धतीने घरी काम आणून करतात तेव्हा घरातली लहान मुले यात ओढली जातात. सरकारी आकडेवारीप्रमाणो देशात दीड कोटी बालमजूर आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार, सहा कोटींपेक्षा अधिक बालकामगार आहेत. या आकडेवारीमध्ये मोठय़ा प्रमाणावर तफावत आढळते. कारण बालकामगार कोणाला म्हणायचे आणि बालमजुरी म्हणजे नक्की काय? याबाबतच मोठा गोंधळ आहे. दरम्यान, एका पाहणीत असे आढळले आहे की, 1993 साली 2.7 कोटी मुलांनी शाळेत प्रवेश घेतला होता. परंतु दहा वर्षांनी यातील केवळ 1 कोटी मुलेच दहावीर्पयत पोहोचली. म्हणजे तीनपैकी दोन मुलांची गळती झाली. 2क्क्9 चा जो शिक्षण हक्क कायदा आहे, त्यामुळे गळतीला आळा घालण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र शालेय व्यवस्थेतून मुलांची गळती होण्याचे हे प्रमाण चिंताजनक आहे. पाहण्यांमध्ये सिद्ध झाले आहे शाळेत जात नाहीत ती मुले बालकामगार म्हणून काम करतात. (प्रतिनिधी)
18 वर्षांखालील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मूल अशी व्याख्या केली जाते. शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असेही म्हटले जाते.
बालकामगार बंदी व नियंत्रण कायद्यानुसार, धोकादायक उद्योगात 14 वर्षांखालील मुलाला कामावर ठेवणा:या व्यक्तींवरच कारवाई करण्याची तरतूद आहे. जेव्हा कारवाई करण्यासाठी धाडी घातल्या जातात, तेव्हा काम करणा:या मुलांचे वय 14 वर्षांपेक्षा जास्त असल्याची पळवाट काढली जाते. शिवाय मुलांना कामावर ठेवणारे लोक कचाटय़ातून सुटून जातात.
गरिबी, बेकारी, अशिक्षितपणा, शहरीकरण, शाळांची कमतरता, बालहक्काच्या कायद्याची अंमलबजावणी न होणो, या कारणांमुळे बालमजुरी सुरूच राहते.