शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प.रे.ची घसरगुंडी; प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: June 1, 2016 04:26 IST

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होत असतानाच पश्चिम रेल्वेकडूनही तोच कित्ता गिरविण्यात आला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लांब पल्ल्याच्या ट्रेनचा एक डबा डाउन धीम्या

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होत असतानाच पश्चिम रेल्वेकडूनही तोच कित्ता गिरविण्यात आला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लांब पल्ल्याच्या ट्रेनचा एक डबा डाउन धीम्या मार्गावर लोअर परळ स्थानकाजवळ घसरला आणि त्यामुळे पश्चिम रेल्वे मंगळवारी सकाळपर्यंत विस्कळीत झाली. हा डबा बाजूला करण्यास पश्चिम रेल्वेला तब्बल नऊ तास लागले आणि या घटनेमुळे १00 पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. घसरलेला डबा हा भंगारात काढण्यात आलेला होता, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. १९ डब्यांची लांब पल्ल्याची एक रिकामी ट्रेन सोमवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजता लोअर परेल कारशेडमधून लोअर परेलच्याच कार्यशाळेत जात होती. ही ट्रेन कारशेडमधून बाहेर पडताच, कार्यशाळेत जाण्यासाठी डाउन (वान्द्रे दिशेने) धीम्या मार्गावर आली असता, तिचा इंजिनकडून असलेला दुसरा डबा रुळावरून घसरला. ही घटना घडताच रेल्वेच्या कर्मचारी आणि कामगारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, डबा हटविण्यासाठी १४0 टनाची क्रेन पश्चिम रेल्वेकडे नसल्याने त्यासाठी मध्य रेल्वेची मदत घेण्यात आली. मध्य रेल्वेकडून ही ट्रेन दादरमार्गे देण्यात आली आणि क्रेन पश्चिम रेल्वेवर घेताना बरीच कसरत करावी लागली. त्यासाठी जवळपास मंगळवारचे पहाटेचे साडेसहा वाजले आणि त्यानंतरच डबा हटविण्याचे काम सुरू झाले, तोपर्यंत डाउन धिम्या मार्गावरील लोकल सेवेचा बोजवाराच उडाला आणि त्यापाठोपाठ अप धिम्या मार्गालाही त्याचा फटका बसला. या दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या जलद मार्गांवर वळविण्यात आल्या. त्यामुळे धिम्या आणि जलद लोकल तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. उशिराने धावत असलेल्या लोकलमुळे सर्व स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. हा मार्ग पूर्ववत झाल्यानंतर डाउन धिम्या मार्गावरीलही अन्य तांत्रिक कामे पूर्ण करून साधारण सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हादेखील मार्ग सुरू करण्यात आला. मध्य रेल्वे सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. या विरोधात मनसेकडून मध्य रेल्वेच्या मुख्यालयातच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी केले. या वेळी एक निवेदनही त्यांच्याकडून मध्य रेल्वेला देण्यात आले. रेल्वेचे वाढते अपघात, रेल्वेमधील महिलांवरील अत्याचार, महिला शौचालयाची दुरवस्था, प्रवाशांचे होणारे हाल अशा विविध विषयांवर मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांच्या नेतृत्त्वाखाली चर्चगेट रेल्वे स्थानकात निदर्शने करण्यात आली. रेल्वेच्या समस्यांबाबत रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. (प्रतिनिधी)पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला. डबा बाजूला करण्यात आल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. घसरलेला डबा हा भंगारात काढण्यात आला होता. तो एका ट्रेनला जोडून कार्यशाळेत नेण्यात येत होता, तेव्हाच ही घटना घडली. तरीही घटनेमागचे नेमके कारण चौकशीनंतरच समोर येईल. -रवींद्र भाकर, पश्चिम रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी