शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीपाठोपाठ काळाची पालकांवरही झडप

By admin | Updated: May 9, 2014 02:00 IST

नियती कशी झडप घालेल, याचा नेम नाही़ अपघातग्रस्त मुलीचा मृतदेह घरी नेत असताना आईवडिलांच्या वाहनावर काळाने झडप घातली

रत्नागिरी : नियती कशी झडप घालेल, याचा नेम नाही़ अपघातग्रस्त मुलीचा मृतदेह घरी नेत असताना आईवडिलांच्या वाहनावर काळाने झडप घातली आणि अवघ्या पाच तासांत अवघं कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले़ संगमेश्वर व पानवलमधील या गुरुवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण ठार झाले. पहाटे झालेल्या रिक्षा अपघातात युवतीचा मृत्यू झाला आणि काही तासांनी तिचा मृतदेह घरी नेण्याआधी तिच्या माता-पित्याच्या कारवर जेसीबी पडला आणि मुलीपाठोपाठ त्या दोघांची प्राणज्योतही मालवली. धनश्री प्रवीण कदम (१७), प्रवीण रामचंद्र कदम (४०), पत्नी प्रियंका (३८), नरेश गणपत देवरुखकर (५० कारमालक ) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी कदम दाम्पत्य पहाटे साडेचार वाजता धनश्रीसह रिक्षाने खेडहून रत्नागिरीत येत होते. सकाळी ६.४५ वाजता संगमेश्वर येथे रिक्षाला अपघात झाला. रिक्षाखाली सापडून धनश्री जागीच ठार झाली. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तिला मृत घोषित केल्यानंतर तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. तिचा मृतदेह घेऊन परतत असताना त्यांच्या कारवर जेसीबी इंजीन पडल्याने कदम दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी) दुसर्‍यांदा काळाने गाठलेच संगमेश्वर येथील रिक्षा अपघातात वाचलेले धनश्रीचे माता-पिता प्रियंका व प्रवीण कदम हे पानवलजवळ झालेल्या कार अपघातात मृत्युमुखी पडले. कारचा चेंदामेंदा झाला होता. झुडुपाच्या एका लहानशा फांदीवर प्रियंका यांचे मंगळसूत्र अडकलेले पोलिसांना आढळले.