शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

स्लॅब कोसळून २५ प्रवासी नाल्यात

By admin | Updated: June 1, 2016 04:21 IST

वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ जवळ असलेल्या नाल्यावरील स्लॅब कोसळून २५ प्रवासी सात फूट खोल नाल्यात पडून जखमी झाले.

वसई : वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ जवळ असलेल्या नाल्यावरील स्लॅब कोसळून २५ प्रवासी सात फूट खोल नाल्यात पडून जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी घडली. २ जणांवर वसईच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गाडी पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे अनेक प्रवासी रेल्वे फलाटाच्या बाहेर असलेल्या नाल्यावर सावलीत उभे होते. लोकलची वेळ झाल्याने सर्वजण जिना चढू लागले. तेव्हाच नाल्यावरील स्लॅब कोसळला व त्यावर उभे असलेले सुमारे २५ प्रवासी सात फूट खोल नाल्यात कोसळले. यातील जिग्नेश नायर आणि मनीष केदारे जखमी झाले. त्यांना आनंदनगर येथील रवि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आनंद याला किरकोळ मार लागल्याने उपचार करून सोडण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे प्रमुख भरत गुप्ता, नगरसेवक वृंदेश पाटील, अग्निशमन दलाचे जवान, रेल्वे प्रशासन अधिकारी दाखल झाले. त्यानंतर नाला व जिना बंदिस्त करण्यात आला. सकाळी लोअर परेल स्थानकाजवळ एक्सप्रेस गाडीचा डबा रुळावरून घसरल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरीय वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली होती. त्यात वसई रोड रेल्वे स्थानकातील सकाळची आठ वाजून अठरा मिनिटांची लोकल रद्द केल्याने प्रवाशांनी ८ वाजून ४४ मिनिटांची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी फलाट क्र.१ वर गर्दी केली होती. ही लोकल फलाटावर आल्यानंतर झुंबड उडाली. फलाट क्र.१ वरून आनंदनगरकडे जाण्यासाठी गटारावर स्लॅब बांधून त्यावर जिना तयार करण्यात आला आहे. स्लॅबवर प्रवाशांचा भार येऊन हा स्लॅब कोसळला. तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने या गटारावरील स्लॅबचे बांधकाम केले होते. तर रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी स्लॅबवर जीना बांधला होता. या दुर्घटनेनंतर दोन्ही प्रशासनांनी हात झटकले. दुर्घटनेची कोणी नोंद करायची यावरून माणिकपूर पोलीस व रेल्वे पोलिसांमध्ये हद्दीचा वाद झाल्याचे दिसून आले. हा नाला पालिकेने २० वर्षांपूर्वी बंदीस्त केला होता. ‘गाडीची वाट पाहत सावलीत उभे होतो. पूल चढताना स्लॅब कोसळून आम्ही नाल्यात पडलो,’ असे जिग्नेश नायर या प्रवाशाने सांगितले.