शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट माल वापरल्यानेच ‘तो’ स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 05:33 IST

बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे परिक्षण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या तज्ज्ञांनी केले

पुणे : बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे परिक्षण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या तज्ज्ञांनी केले असून त्यांनी दिलेल्या अहवालावरुन या गुन्ह्यात आवश्यक त्या कलमांचा समावेश केला असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील उज्वला पवार यांनी केला़ बालेवाडी येथील स्लॅब दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत़ त्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय़ पी़ लाडेकर यांच्या न्यायालयात सुरु आहे़ बुधवारी बचाव पक्षाच्या वकीलांचे युक्तीवाद झाले़ सरकारी वकील उज्वला पवार यांनी गुरुवारी आपला युक्तीवाद सुरु केला़ त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेनंतर इंजिनिअरिंग कॉलेजमधील तज्ज्ञांनी येथे येऊन बांधकामासाठी वापरलेल्या कच्च्या मालाचे परिक्षण केले़ ते निकृष्ट असल्याचा अहवाल दिला आहे़ बांधकाम व्यावसायिकांनी कंत्राटदाराशी केलेल्या करारात प्रत्येक मजल्याचे बांधकाम केल्यानंतर त्यांचा इंजिनिअर येऊन त्याची तपासणी करेल व त्यानंतर पुढील कामाला परवानगी दिली जाईल, असे म्हटले आहे़ याचा अर्थ या बांधकाम व्यावसायिकांना या ठिकाणी बांधकाम करताना दुर्घटना घडू शकते, याची कल्पना होती़ हे कामगार १४० फुटावर काम करीत होते़ त्यांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरविल्यानेच त्यांचा इतक्या उंचावरुन पडून मृत्यु झाला़ हा गुन्हा अजून तपासावर आहे़ अजून दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केलेले नाही़ असे असताना पोलिसांनी त्यातील कलमे चुकीची लावली, असे म्हणता येणार नाही़ या गुन्ह्यात मृत्युमुखी पावलेल्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिल्याची प्रतिज्ञापत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत़ परंतु, त्यावर कोण नातेवाईक आहे, त्याचे पत्ते काय, तसेच त्यावर स्वाक्षरी नाही़ ही न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले़ अ‍ॅड़ पवार यांचा युक्तीवाद गुरुवारी अपूर्ण राहिला असून तो शुक्रवार सुरु करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)