शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

स्कायवॉकवर गुटुर्र गू!

By admin | Updated: July 21, 2016 02:32 IST

स्कायवॉकच्या सुरक्षेकडे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने तेथे प्रेमीयुगुलांचे चाळे वाढले आहेत.

आकाश गायकवाड,

डोंबिवली- कल्याण-डोंबिवलीत स्टेशन परिसरातील गर्दी कमी व्हावी आणि पादचाऱ्यांची सोय व्हावी म्हणून कोट्यवधी रूपये खर्चून बांधलेल्या स्कायवॉकच्या सुरक्षेकडे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने तेथे प्रेमीयुगुलांचे चाळे वाढले आहेत. त्यातच सायंकाळनंतर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने आणि कॅमेरे नसल्याने अवैध धंदा करणाऱ्यांचे फावत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील रेल्वेपुलाला जोडून स्कायवॉक बांधण्यात आले. त्यातून स्टेशन परिसरातील गर्दी कमी व्हावी हा हेतू होता. मात्र फेरीवाले, अवैध विक्रेते यांनीच त्यांचा ताबा घेतला. शहर पोलीस, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल यांच्या हद्दीच्या वादात फेरीवाल्यांवर फारशी कारवाई होत नसल्याने त्यांनी तेथील मोक्याच्या जागा बळकावल्या आहेत. त्या जागेच्या मालकीवरून फेरीवाल्यांत मारामाऱ्याही हत आहोत. या स्कायवॉकसाठी पालिका, एमएमआरडीएक, रेल्वे यांनी कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. कल्याणच्या स्कायवॉकवर आधीच शेड होती. मात्र डोंबिवलीत फेब्रिक शेड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यातून प्रवाशांची सोय होण्याऐवजी फेरीवाले, प्रेमी युगुले, अवैध धंदा करणाऱ्यांना आसरा मिळाला. त्यांची सोय झाल्याचे या स्कायवॉकवर फिरताना जाणवतो. फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने त्यांच्या मालाच्या ने-आणीत लाद्या तुटल्या आहेत. कठडे मोडले आहेत. शिवाय त्यांच्या मालामुळे पुलावर, पुलाखाली, रेल्वे मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरते आहे. भटकी कुत्री, मोकाट जनावरे, गर्दुल्ले, भिकारी यांचाही तेथे मुक्त संचार असतो. दुपारी आणि रात्रीची गर्दीची वेळ टळताच स्कायवॉकवर शुकशुकाट असल्याने त्याचा फायदा घेऊन अनेक तरु ण-तरु णींचा प्रणय रंगात आल्याचे दिसून येते. ज्या भागात अजून शेड टाकलेली नाही तेथे पावसाचा फायदा गेत छत्रीच्या आडोशाने चाळे सुरू असतात. त्यामुळे स्कायवॉकवरून जाणाऱ्यांना मान खाली करून प्रवास करावा लागतो. कल्याण-डोंबिवलीतील उद्याने, खाडीकिनारे, या प्रेमीयुगलांनी आधीच हाऊसफुल्ल असताना आता त्यांनी स्कायवॉकचाही आधार घेतल्याचे दिसून येते. सार्वजनिक ठिकाणी चाळे सुरू असूनही पोलीस मात्र त्यावर कारवाई करताना दिसत नाहीत. >वारांगनांचाही वावरपावसामुळे आणि रस्त्यावरील गर्दी कमी असल्याने वारांगना आणि अवैध धंदे करणाऱ्यांनाही मोकळे रान मिळाले आहे. त्यांच्यामुळे अन्य महिलांनाही आंबटशौकीन प्रवाशांचा त्रास होतो.त्यामुळे किमान रात्रीच्या वेळी स्कायवॉकवर सुरक्षा ठेवावी, अशी महिला प्रवाशांची मागणी आहे.