शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री

By admin | Updated: June 28, 2017 02:10 IST

राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी केल्याने तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. पण त्यातूनही मार्ग काढू, सध्या आभाळच फाटलेय, पण खचून न जाता ते शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील ४० गावांतील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन आभार मानले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव अनुदान देण्याची मागणीही केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा आमचा निर्धार आहे. वित्त विभागाने १५ हजार कोटींच्या वर कर्जमाफी करू नका, अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली. समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दिलेल्या जमिनी कोल्ड चेन स्टोरेजसाठी वापरणार आहोत. समस्या संपणार नाही, पण पर्याय शोधत राहू. दरवेळेस आंदोलन करायची गरज नाही, चर्चेने नेहमी मार्ग निघू शकतो, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.शेतीसाठी सोलार फिडर-शेतीसाठी सोलार फिडर आणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळेल. त्याची सुरु वात राळेगणसिद्धीतून होईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या जे विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी कर्ज काढावे लागणार होते. मात्र आता कल्पक (इनोव्हेटिव्ह ) पद्धतीने पैसे उभारावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.