शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव कायद्यातून सापाला वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 02:11 IST

वन्यजिवाने चावा घेतल्यास अथवा त्याच्या हल्ल्यात जीव गेल्यास आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या वन्यजीव संरक्षण अधिनियमात संरक्षित असलेल्या

- श्याम बागुल । लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : वन्यजिवाने चावा घेतल्यास अथवा त्याच्या हल्ल्यात जीव गेल्यास आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या वन्यजीव संरक्षण अधिनियमात संरक्षित असलेल्या विषारी साप, नागाच्या दंशाने बळी गेलेल्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. उलट साप बाळगल्यास वा जिवाच्या भीतीने त्याला मारल्यास कायद्यात कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने वन्यजिवांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने कायदा केला असून, त्यात जंगलातील जवळपास सर्वच हिंस्त्र प्राणी तसेच पक्ष्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या कायद्याच्या आधारे वन्यजीव बाळगणे, त्यांचे संगोपन करणे अवैध ठरविण्याबरोबरच त्यांची हत्या करणे वा त्याला जखमी करणे कायद्याने गुन्हा ठरविला आहे. तसेच वन्यजीव म्हणून गणल्या जाणाऱ्या प्राण्यांकडून हल्ला झाल्यास वा व्यक्तीचा जीव गेल्यास संबंधितांना नुकसानभरपाई देण्याचीही तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यात सापांचाही समावेश करण्यात आला आहे. साप बाळगल्यास वा मारल्यास दोन वर्षे शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. दरवर्षी सर्पदंशाने हजारो नागरिकांचा बळी जातो. पावसाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होते. परंतु कायद्यानुसार बळी गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाला नुकसानभरपाई देण्याची तरतूद कायद्यात नाही.दररोज अकरा सर्पदंशएकट्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दर दिवशी सर्पदंशाच्या अकरा घटना घडत आहेत. गेल्या वर्षभरात ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशामुळे उपचारार्थ ३०१० रुग्ण दाखल झाले तर जिल्हा शासकीय रुग्णालयात १०५१ अशा प्रकारे ४०६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यातील जवळपास अधिक रुग्ण वेळीच उपचार मिळाल्याने बरे झाले तर सर्पदंशाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही शेकडोच्या घरात आहे.वनखाते अनभिज्ञवन्यजीव संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वन खात्यावर असली तरी, सर्पदंशाने जखमी वा मृत झालेल्यांबाबतची कोणतीही माहिती या खात्याकडे नाही. नागरिकांच्या तक्रारीवरून वन खात्याने सर्प बाळगणाऱ्या दोघा-तिघांवर कारवाई केली आहे, परंतु सर्प मारून टाकण्याच्या किती घटना घडल्या याचीही नोंद नसल्याचे विभागीय वन अधिकारी व्ही. टी. घुले यांनी सांगितले. सापाला वन्य प्राण्यांच्या यादीतून वगळा सापाचा वन्यजीव सुरक्षा कायद्यात समाविष्ट करण्यात आल्यामुळे साप मारल्यास वा पकडल्यास शेतकरी व शेतमजुरांना दोन वर्षे शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अडकविण्यात येते, परंतु साप चावून मनुष्य मेल्यास त्याला इतर वन्यप्राण्यांप्रमाणे आर्थिक मदतीचे अनुदान देय नाही. दरवर्षी शेकडो शेतकरी, शेतमजूर व पशुधन राज्यात साप चावून मरतात. म्हणून सर्पदंश होऊन मनुष्य मेल्यास त्यालाही इतर वन्यप्राण्यांप्रमाणे आर्थिक अनुदान देण्यात यावे किंवा साप हा प्राणी वन्यप्राण्यांच्या यादीतून वगळण्यात यावा. - माजी आमदार वामनराव चटप, शेतकरी संघटना