शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर कौशल्य विकास केंद्र; रोजगारासाठी स्थानिकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 04:08 IST

समृद्धी महामार्गावरील ७०१ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक दीड ते दोन वर्षांत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबई : मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना वेगवान वाहतूक व्यवस्थेने जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. महामार्ग ज्या जिल्ह्यातून जातो, त्या भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रोथ सेंटर्सही उभारण्याचे नियोजन आहे. त्यातून भविष्यात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. मात्र, त्या संधीचे सोने करण्यासाठी स्थानिकांकडे कौशल्याची कमतरता असेल. तेथे परप्रांतीय तरुणांची भरणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यातील ही संभाव्य कोंडी टाळण्यासाठी या महामार्गावरील पाच जिल्ह्यांत नऊ ठिकाणी कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) उभारण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.

समृद्धी महामार्गावरील ७०१ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक दीड ते दोन वर्षांत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या महामार्गावर १९ ठिकाणी ग्रोथ सेंटर्स (टाउनशिप) विकसित केले जाणार असून, तेथे कृषी विकास केंद्र आणि कमर्शियल हब स्थापनेचे नियोजन आहे. या ग्रोथ सेंटरमध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावा, यासाठी कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार पुढे आल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील फुगाळे गावासह केळझार व विरूल (वर्धा), मेहकर, सावरगाव (बुलडाणा), हडस पिंपळगाव, घाईगाव, बबटारा (औरंगाबाद) या ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. एमएसआरडीसीए ही व्यवस्था खासगी भागीदाराच्या सहकार्याने उभारणार आहे. प्रस्तावाची तत्काळ, मध्यम आणि दीर्घकालीन उपयुक्तता लक्षात घेत, त्यानुसार केंद्रांचे नियोजन केले जाईल. या केंद्राची आर्थिक व्यवहार्यता तिथले व्यावसायिक प्रशिक्षण, अभ्यासक्रमाची आखणी, काळानुरूप त्यात आवश्यक असलेले बदल, प्रशासकीय कामकाज, त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग अशी सर्व जबाबदारी भागीदार संस्थेवरच असेल. ग्रोथ सेंटर्सच्या निर्मितीनंतर या ठिकाणी कुशल रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि तेथे हे कुशल स्थानिक तरुण नोकरी किंवा व्यवसाय करू शकतील. या केंद्रांच्या उभारणीसाठी स्वारस्य देकार मागविण्यात आले असून, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष केंद्रांची उभारणी सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणाची संधीस्थानिक पातळीवरील आर्थिक केंद्रांत भविष्यात निर्माण होणाºया रोजगाराच्या संधीनुसार कृषी आणि संलग्न उद्योग, इमारत बांधकाम, वाहनांची देखभाल दुरुस्ती, केमिकल आणि फार्मा, आयटी, आरोग्यसेवा, टेक्सटाइल आणि कापडनिर्मिती, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, वाहतूक आणि लॉजिस्टिक, शिक्षण, फूड प्रोसेसिंग, ज्वेलरी मेकिंग, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, प्लंबर, सुतार यांसह असंख्य क्षेत्रांतील प्रशिक्षणाच्या संधी येथे तरुणांना उपलब्ध करून दिल्या जातील.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग