शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास मंडळ

By admin | Updated: March 25, 2017 00:27 IST

राज्याच्या प्रत्येक औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एक कौशल्य विकास मंडळ असावे यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे

मुंबई : राज्याच्या प्रत्येक औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एक कौशल्य विकास मंडळ असावे यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भाजपाचे अतुल भातखळकर यांनी खालापूर तालुक्यातील भूसंपादनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर देसाई म्हणाले की, खालापूर टाकुलीतील १२ गावांमधील १ हजार १५० हेक्टर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित केलेली आहे. तेथे येण्याची तयारी अनेक उद्योगांनी दाखविली आहे. तेथे वाटाघाटी करून जमिनीचे दर निश्चित केले जातील.चर्चेत सदस्य आशिष शेलार, योगेश सागर आदींनी भाग घेतला.वीज तारा देखभालीसाठी डीपीसीने निधी द्यावा महावितरण कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील प्रक्रि या आता आॅनलाईन करण्यात येत आहे. राज्यातील वीजेच्या तारांची देखभाल दुरु स्ती करण्यासाठी ५ हजार ५०० कोटी रु पयांची आवश्यकता असून राज्य शासन व जिल्हा विकास नियोजन निधीतून ही रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले.सावरडे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे वीजेची तार गळ्यात अडकून दुचाकीस्वाराच्या झालेल्या मृत्यूबाबत सदस्य सदानंद चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बावनकुळे म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला महावितरणमार्फत चार लाख रु पयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या वीजेच्या तारेसंदर्भात कारवाई करण्याबाबत संबंधित लाईनमनला निर्देश देण्यात आले होते. मात्र त्याने योग्य वेळी कार्यवाही न केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत मुख्य विद्युत निरीक्षकाच्या माध्यमातून या घटनेची अंतिम चौकशी करु न कारवाई करण्यात येईल.विनावापर २ हजार भूखंड ताब्यात-राज्यात औद्योगिकीकरणासाठी देण्यात आलेले मात्र विनावापर असलेले दोन हजार भूखंड ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांचे पुनर्वाटपाची प्रक्रि या सुरु झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत दिली.सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग उभारणीसाठी वितरीत केलेले भूखंड विनावापर पडून असल्याबाबत सदस्य सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. देसाई म्हणाले की, या दोन जिल्ह्यात २६५१ भूखंडांपैकी २४९५ भूखंडांचे औद्योगिक वापरासाठी वितरण करण्यात आले. मात्र यातील सुमारे ११० भूखंड विनावापर पडल्याचे आढळून आले. ते ताब्यात घेण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)