पुणे : राज्यातील स्वाइन फ्लूचा प्रभाव अद्यापही कायम असून शनिवारी सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे १ जानेवारीपासून राज्यातील मृतांचा एकूण आकडा ४३१वर पोहचला आहे. शनिवारी राज्यात स्वाईन फ्लूचे ५३ नवे रुग्ण आढळले.मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. आता एप्रिल महिना सुरू होऊनही उन्हाची तीव्रता वाढलेली नाही. परिणामी स्वाईन फ्लूचा प्रभाव फारसा कमी झालेला नाही. शुक्रवारी राज्यात स्वाईन फ्लूचा एकही बळी गेला नव्हता. मात्र शनिवारी सहा जणांचे बळी गेले तर ५३ नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात ४ लाख ९२ हजार ८३९ स्वाइन फ्लू सदृश रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४९ हजार ६६२ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात स्वाइन फ्लूचे सहा बळी
By admin | Updated: April 6, 2015 03:21 IST