शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात सहा लग्न व-हाडी ठार

By admin | Updated: April 23, 2016 02:28 IST

सर्व मृतक लोणार तालुक्यातील; लग्न सोहळा आटोपून घरी जात असताना घडला अपघात.

भर जहाँगिर (वाशिम) : लग्न सोहळा आटोपून घरी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात होऊन, कारमधील सहा जण घटनास्थळीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील भर जहाँगीर गावाजवळ २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. सर्व मृतक बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वडव येथील रहिवासी आहेत. लोणार तालुक्यातील वडग गावातील नागरिक रिसोड तालुक्यात आगरवाडी येथे एका विवाह सोहळय़ासाठी आले होते. विवाह सोहळा आटोपून ते एमएच १४ सीएक्स ८६५५ क्रमांकाच्या इंडिका कारने शुक्रवारी सायंकाळी गावासाठी निघाले. भर जहाँगीर गावापासून १ किमी अंतरावरील एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कडूलिंबाच्या झाडावर आदळली. त्यानंतर शेतकर्‍याने हळदीचे बेणे ठेवण्याकरिता केलेल्या एका खड्डयात ही कार पडली. या अपघातात सुनिल माणिकराव मुंडे, गजानन कडुजी घुगे, बाळू नामदेव काळे, अशोक भगवान कायंदे, पिंटू तनपुरे आणि चालक विष्णू रामकिसन सोनोने यांचा मृत्यू झाला. कार खड्डयात पडल्याने, कारमधील लोकांना बाहेर पडता आले नाही. कारमधील सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पंढरी रणधीर सोनवणे हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रिसोड येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती; मात्र जखमींना बाहेर काढण्यास कुणीही धजावले नाही. अखेर रिसोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून, जखमींना रूग्णालयात भरती केले.