शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

फुकट्या प्रवाशांना सहा लाखांचा दंड

By admin | Updated: January 29, 2015 00:08 IST

रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : साडेतीन हजार जणांकडून वसुली; भिकारी, तृतीयपंथीयांचा समावेश--लोकमत विशेष

सदानंद औंधे - मिरज --मिरज रेल्वे सुरक्षा दलाने कोल्हापूर, मिरज, सांगली स्थानकात फुकटे प्रवासी, फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी व रेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३६५९ जणांकडून वर्षभरात ८ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापैकी २०४१ फुकटे प्रवासी असून, त्यांनी ५ लाख ९८ हजार रुपये दंड भरला आहे. रेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना, भिकाऱ्यांना, फेरीवाल्यांना व तृतीयपंथीयांना पकडून प्रत्येक महिन्यातून दोनवेळा मिरजेत येणाऱ्या रेल्वेच्या फिरत्या न्यायालयासमोर हजर करण्यात येते. रेल्वे कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल शंभर ते एक हजारापर्यंत दंड किंवा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र तरीही रेल्वे कायद्याला न जुमानणाऱ्या प्रवासी, भिकारी, फेरीवाले, तृतीयपंथीयांच्या संख्येत वाढच होत आहे. २०१३ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात ६ लाख रुपये दंड वसूल केला होता; मात्र गतवर्षी दंडाच्या रकमेत वाढ होऊन ही रक्कम ८ लाख ६५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. कोल्हापूर, सांगली ते साताऱ्यापर्यंत रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट तपासनीसांसोबत मोहीम राबवून वर्षभरात पॅसेंजर व एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या २०४१ फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ९८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय विनाकारण साखळी ओढून रेल्वेला विलंब करणारे, रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणारे, अनधिकृत तिकीट एजंट, फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी, रेल्वेत व रेल्वेस्थानकात अस्वच्छता करणारे, नियमबाह्य रेल्वेरुळ ओलांडणारे, रेल्वेच्या प्रवेशद्वारात लोंबकळत धोकादायक प्रवास करणारे, आरक्षित महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे, रेल्वेत धूम्रपान करणारे, विनाकारण साखळी ओढून गाडी थांबविणारे व धावत्या रेल्वेत भांडण, मारामारी करणारे, रेल्वे सिग्नलची केबल तोडणारे, रेल्वेच्या प्रवेशद्वाराला ठोकरून नुकसान करणारे वाहनधारक अशा १६१८ जणांना पकडून त्यांच्याकडून २ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक गोकुळ सोनोनी यांनी दिली.भिकाऱ्यांना पकडून होते फसगतमिरज, सांगली व कोल्हापूरसह विविध स्थानकांत भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेत प्रवाशांकडून भीक मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळ्याही सक्रिय आहेत. मात्र वर्षभरात केवळ ४० भिकारी व तृतीयपंथीयांवरच कारवाई झाली आहे. भिकारी पकडले गेल्यावर दंड भरण्यास नकार देतात. दंड न भरणाऱ्यांना पुणे येथील कारागृहात पाठवावे लागते. पुणे येथील कारागृहात नेण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा भिकाऱ्यांचा दंड भरून रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सुटका करून घेतात. भिकाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल होत नसल्याने भिकाऱ्यांना हुसकावून लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली.नियम मोडणारे प्रवासीसंख्या दंडविनातिकीट प्रवासी २०४१ ५,९८०००रुळ ओलांडणारे ९२९ ९२,९००अवैध फेरीवाले ३०६ १,०४,०००साखळी ओढणारे ९ ३१००भिकारी, तृतीयपंथी ४० १३,२००अनधिकृत तिकीट एजंट ९ ३०००नियम मोडणारे प्रवासीसंख्या दंडधोकादायक प्रवास करणारे १३१ १५,५००महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे १४ १९००धूम्रपान करणारे १७ ३०००रेल्वे केबल चोरी १० १०,०००रेल्वे फाटकाचे नुकसान ६ ६०००गाडीत भांडण करणारे २ १६००