शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहा आयएएस १५ दिवसांत बदलले

By admin | Updated: May 13, 2016 03:51 IST

प्रशासकीय फेरबदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिल रोजी तब्बल ७३ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या घाऊक बदल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती

मुंबई : प्रशासकीय फेरबदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिल रोजी तब्बल ७३ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या घाऊक बदल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. आज त्यातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन वा आधीचे पोस्टिंग देण्यात आले. दिलीप शिंदे हे महानंदचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. एस.एस. डुंबरे हे पुणे येथे भूमी अभिलेख विभागाचे नवे उपसंचालक असतील. शैलेश नवल हे वर्धेचे, आशुतोष सलिल चंद्रपूरचे ,तर रंगा नायक गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी असतील. संपदा मेहता या पुण्याच्या कृषी संशोधन परिषदेच्या नवीन प्रकल्प संचालक असतील. राहुल रेखावार हे अकोलाचे नवे व्यवस्थापकीय संचालक तर संजय मीना हे वस्रोद्योगचे (नागपूर) नवे संचालक असतील. २७ एप्रिलच्या बदल्यांमध्ये संपदा मेहता यांना अहमदनगरचे जिल्हाधिकारीपद देण्यात आले होते. आता तेथे अनिल कवडे कायम असतील. कवडे यांची एकात्मिक बालविकास सेवा योजनेत केलेली बदली रद्द झाली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी आधी करण्यात आलेली बदली आज रद्द करण्यात आली. ते पालघरमध्ये कायम असतील. पालघरच्या जिल्हाधिकारीपदी शैलेश नवल यांची आधी झालेली बदली आता रद्द झाली असून, त्यांना याच पदावर वर्धेला पाठविण्यात आले आहे. संजय मिना यांना यांची आधी महाबीज; अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून केलेली बदली रद्द झाली. (विशेष प्रतिनिधी)