शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धुळगावला रात्रीत सहा घरे फोडली

By admin | Updated: October 31, 2016 04:55 IST

दिवाळीच्या धामधुमीत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सहा घरे फोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.

तासगाव/सोनी : तासगाव तालुक्यातील धुळगाव येथे ऐन दिवाळीच्या धामधुमीत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सहा घरे फोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. शनिवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. सहा ते सात घरांत घरफोडीचा प्रकार झाला. सुमारे अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि चांदीच्या वस्तू आणि मोटारसायकल लंपास केली आहे. या दरोड्याच्या घटनेने धुळगावसह परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली असून, याबाबत तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धुळगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामपंचायतजवळील तसेच राम मंदिराशेजारील चार घरात, तसेच गावाबाहेरील दोन घरात चोरट्यांनी हात साफ केला. त्यापैकी कुलूपबंद असलेल्या दोन घरांचे दरवाजे कटावणीच्या साहाय्याने उघडून कपाट, तसेच सुटकेस फोडून त्यातील मुद्देमाल लंपास केला. सतीश भीमराव जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून सव्वा तोळे सोने, सात हजार रुपये, चांदीच्या गणेशमूर्तीसह अन्य भांडी लंपास केली. शामगोंडा सिदगोंडा पाटील यांच्या घराजवळून स्प्लेंडर (एमएच १० बीई ६९७९) ही दुचाकी चोरीस गेली. बाबासाहेब लालासाहेब डुबल यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुटकेसमधील साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने, दहा हजार रुपये लंपास केले. मन्सूर बाळू मगदूम यांच्या घरातून पाऊण तोळे सोने आणि पंधरा हजार रुपये लंपास केले. शरदराव केशवराव डुबल यांच्या घरातून मोबाईल आणि बाराशे रुपये लंपास केले. रामचंद्र धोंडी गायकवाड यांच्या घरातून पेटी फोडून पाचशे रुपये लंपास केले. चोरीसाठी वापरण्यात आलेली कटावणी आणि कुऱ्हाड यावेळी सापडली. चोरीची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)>चोरी सत्राने घबराट मुख्य रहदारीच्या रस्त्यापासून धुळगाव हे गाव आडबाजूला आहे. या गावात मध्यरात्री सहा ठिकाणी चोरी झाल्याने गावासह परिसरातील गावात घबराटीचे वातावरण आहे. चोरट्यांनी एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरी करुन घरातून पळवून नेलेल्या सुटकेस, पेट्या गावाबाहेर शेताकडेला फेकून दिल्याचे निदर्शनास आले.