शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सहा जिल्ह्यांचे नकाशे डिजिटल

By admin | Updated: January 7, 2017 01:00 IST

राज्यातील सहा जिल्ह्यांचे डिजिटल नकाशे तयार करण्याची विषेश मोहीम भूमिअभिलेख विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे.

पुणे : राज्यातील सहा जिल्ह्यांचे डिजिटल नकाशे तयार करण्याची विषेश मोहीम भूमिअभिलेख विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. डिजिटल नकाशे तयार झाल्यास, जमिनींच्या गैरव्यवहारांना ‘चाप’ बसण्यास मदत होणार असून, शेताच्या बांधावरून भावकी-गावकीत होणारे तंटे निकालात निघणार आहेत. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाांतर्गत (एनएलआरएम) देशभरात डिजिटल नकाशे तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य पन्नास टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे. या मोहिमेसाठी दीडशे कोटींचा खर्च अपेक्षित असून, या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे जमिनीच्या चतु:सीमा तसेच जमिनीच्या मालकीवरुन होणारे तंटे आदी विषयांबाबत सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. राज्यातही डिजिटल नकाशे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, एप्रिल २०१८पर्यंत पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यांचे डिजिटल नकाशे करण्यात येणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अनेकदा शेतीच्या सीमा रेषा आणि तिचे तुकडे कसे करावेत यावरून वाद असतात़ बांधाच्या वादाचे अनेक खटले हे न्यायालयात पिढ्यान् पिढ्या पडून आहेत़ यावर मार्ग काढण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारने डिजिटल इंडिया या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे़ त्यासाठी मुंबई वगळून नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, रायगड आणि पुणे या सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात राज्य सरकारचा सहभाग असणार आहे़ पुणे जिल्ह्याची यात निवड झाल्याने भूमी अभिलेख कार्यालयात यासाठी निविदा प्रकिया राबविण्यात आली आहे़ त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च केले जाणार असून, त्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे़ केंद्राच्या या खास कार्यक्रमांतर्गत वेळप्रसंगी अधिकचा खर्च करण्याची तयारी राज्य सरकाराने दाखवली आहे. येत्या वर्षभरात नकाशांचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर, सात-बाऱ्यावर डिजिटल सही उपलब्ध होणार आहे़ (प्रतिनिधी)>सात-बारा आॅनलाइन आणि ई-फेरफार या नंतर सहा जिल्ह्यांतील तेरा प्रकारच्या जमिनींच्या नकाशांचे डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत आता सूक्ष्म पद्धतीने डिजिटायझेशन केले जाणार आहे़ त्यामुळे जमिनींचे सहजपणे तुकडे करता येणार असून, पोटहिस्सा निश्चितीकरण करता येणार आहे़