नागपूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये यवमाळमधील उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर येथील सचिन नलावडे (३०), अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव येथील लीलाबाई पांडेकर (६५) आणि वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील सिल्ली (दसोडा) येथील लक्ष्मण पुसदेकर (४०) व रामपूर येथील प्रवीण देवघरे (४०) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)मराठवाड्यात दोघांनी जीवनयात्रा संपविलीमराठवाड्याच्या परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील दोन शेतकऱ्यांनीही नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले. परभणीच्या पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील मोहन घुंबरे(४२) यांच्या नावे ४ एकर शेती आहे. मात्र, नापिकी व बँकेचे कर्ज याला कंटाळून त्यांनी सोमवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. दुसरी घटना नांदेडमधील कोथळा (ता़ हदगाव) येथे घडली. दिनकर वानखेडे (२२) यांना तीन वर्षांपासून शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. या विवंचनेतून त्यांनी सोमवारी पहाटे शेतात जाऊन आत्महत्या केली़
राज्यात सहा कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: December 8, 2015 01:46 IST